Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2023 : 1489 दिवसानंतर कोहलीच्या शतकानं बंगळुरूचा विजय, क्लासेनच्या शतकाला धक्का

IPL 2023 : 1489 दिवसानंतर कोहलीच्या शतकानं बंगळुरूचा विजय, क्लासेनच्या शतकाला धक्का

Subscribe

आयपीएलमध्ये तब्बल 4 वर्षानंतर आरसीबीचा माजी कर्णधार आणि वेगवान खेळाडू विराट कोहलीने सहाव्या शतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. त्यामुळे प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा अद्यापही आरसीबीच्या चाहत्यांना लागून राहिल्या आहेत. हा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमाकांवर पोहोचला आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना हेनरिक क्लासेनने शतक झळकावले. क्लासेनच्या शतकाच्या जोरावर संघाने 20 ओव्हर्समध्ये 5 गडी गमावून 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूने कोहलीचे शतक आणि फाफ डू प्लेसिससोबत केलेल्या 172 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 19.2 ओव्हर्समध्ये 2 गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले.

- Advertisement -

1489 दिवसानंतर विराटचे शतक

विराट कोहलीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चालू हंगामातील पहिले शतक झळकावले आहे. विराटचे हे सहावे आयपीएल शतक आहे. त्याने शेवटचे शतक 19 एप्रिल 2019 रोजी कोलकाता येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केले होते. त्यानंतर कोहलीने 1489 दिवसांनी आयपीएलमध्ये शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचीही आयपीएलमध्ये 6 शतकं आहेत. 5 शतकांसह जॉस बटलर या यादीत गेल आणि कोहली यांच्या मागे आहे.

- Advertisement -

यापूर्वी 2016 च्या हंगामात विराटने 4 शतकं झळकावली होती. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 113 आहे. आपल्या सहाव्या शतकासह कोहलीने आयपीएलमधील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

एकाच सामन्यात झळकावली 2 शतकं

या हंगामात शतक झळकावणारा विराट कोहली हा 8वा फलंदाज ठरला. त्याच्याआधी सनरायझर्स हैदराबादकडून हेनरिक क्लासेननेही याच सामन्यात शतक झळकावले होते. शतक ठोकण्याची त्याच्याही पहिलीच वेळ होती. मात्र, आरसीबीने आपला सामना खिशात घातल्यामुळे त्याचं शतक कामी आलं नाही. मात्र, एकाच सामन्यात 2 शतकं ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या दोघांच्या आधी हैदराबादचा हॅरी ब्रूक, गुजरातचा शुभमन गिल, राजस्थानचा यशस्वी जायस्वाल, मुंबईचा सूर्यकुमार यादव, कोलकाताचा व्यंकटेश अय्यर आणि पंजाबचा प्रभसिमरन सिंग यांनी शतकं ठोकली आहेत. तर विराट वगळता उर्वरित 7 खेळाडूंनी स्पर्धेत पहिल्यांदाच शतक झळकावले आहे.


हेही वाचा : प्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदालची निवृत्ती; 2024 हे शेवटचे वर्ष, तर फ्रेंच ओपनमधूनही माघार


 

- Advertisment -