Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाVirat Kohli : पाकिस्तानविरुद्धचं शतक कोहलीसाठी फायदेशीर; ICCच्या क्रमवारीत विराट पोहोचला पाचव्या स्थानी

Virat Kohli : पाकिस्तानविरुद्धचं शतक कोहलीसाठी फायदेशीर; ICCच्या क्रमवारीत विराट पोहोचला पाचव्या स्थानी

Subscribe

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा रनमशीन विराट कोहली याने शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या या शतकामुळे भारतीय संघाला पाकिस्तानवर दमदार विजय मिळवता आला. शिवाय, हा सामना जिंकत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

Virat Kohli Champions Trophy 2025 मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा रनमशीन विराट कोहली याने शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या या शतकामुळे भारतीय संघाला पाकिस्तानवर दमदार विजय मिळवता आला. शिवाय, हा सामना जिंकत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील शतकाचा विराट कोहली याला व्यक्तिगत फायदा ही झाला आहे. त्यानुसार, आयसीसीच्या क्रमवारीत विराट कोहलीला फायदा झाला आहे. (Virat Kohli Champions Trophy 2025 icc odi rankings century against pakistan)

आयसीसीने बुधवारी (26 फेब्रुवारी) ताजी वनडे आकडेवारी जाहीर केली आहे. आयसीसीच्या या क्रमवारीत विराट कोहली पाचव्या स्थानावर आला आहे. याआधी कोहली सहाव्या स्थानावर होता. कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 111 चेंडूंमध्ये नाबाद 100 धावा केल्या. कोहलीच्या या खेळीत ७ चौकारांचाही समावेश होता. विराटच्या या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला.

आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. शुभमन गिल अव्वल आहे. तर पाकिस्तानी खेळाडू बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. शुभमन गिल याला 817 रेटिंग मिळाले आहेत. तसेच, बाबर आझम याला 770 रेटिंग मिळाले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला 757 रेटिंग मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन चौथ्या क्रमांकावर आहे. यानंतर कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. कोहलीला 743 रेटिंग मिळाले आहे.

आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला फायदा झाला आहे. दुखापतीमुळे शमी बराच काळ भारतीय संघाबाहेर राहिला होता. मात्र, आता त्याने पुनरागमन केले आहे. मोहम्मद शमीने अनेक वेळा भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दोन सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत. याचा फायदा शमीला वनडे क्रमवारीत झाला आहे. त्यापूर्वी तो 15 व्या स्थानावर होता. पण आता शमी 14 व्या स्थानावर आला आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंकेचा खेळाडू महेश थीकशन अव्वल स्थानावर आहे.


हेही वाचा – Harbhajan Singh : वाह, इंग्रजांची औलाद…, एक्सवर हरभजन सिंग अन् प्रेक्षकामध्ये वाद; नेमकं काय घडलं?