Homeक्रीडाVirat Kohli : सुरक्षा भेदून विराट कोहलीचा चाहता मैदानात, नेमकं काय घडलं?

Virat Kohli : सुरक्षा भेदून विराट कोहलीचा चाहता मैदानात, नेमकं काय घडलं?

Subscribe

नवी दिल्ली : तब्बल 12 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर भारतीय स्टार फलंदाज आणि संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा रणजी खेळताना दिसत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये तो दिल्लीकडून खेळत असून गुरुवारी (30 जानेवारी) दिल्ली आणि रेल्वेमध्ये रणजी सामन्याला सुरुवात झाली. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. अशामध्ये मोठ्या कालावधीनंतर विराट हा देशांतर्गत सामना खेळत असून त्याला पाहण्यासाठी स्टेडियमवर मोठी गर्दी झाली होती. यावेळी एका त्यांच्या एका चाहत्याने गौतम गंभीर स्टँडमधून थेट मैदानात घुसला आणि त्याने कोहलीकडे धावा केला. (Virat Kohli fan breach security in ranji trophy match)

हेही वाचा : Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या फलंदाजीवर पार्थिव पटेलचा सवाल; गंभीर आरोप करत म्हणाला… 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसते की, एक चाहत्याने गौतम गंभीर स्टँडमधून थेट मैदानात उडी मारली. त्यानंतर तो थेट विराट कोहलीकडे धावत गेला. यावेळी कोहली स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. तो चाहता कोहलीकडे धावत गेला आणि त्याच्या पाया पडला. यानंतर लगेचच सुरक्षा रक्षक मैदानात आले आणि त्या चाहत्याला पकडून स्टेडीयम बाहेर काढले. हा सर्व प्रकार अचानकपणे घडल्याने एकाच गोंधळ उडाला होता. कोहलीच्या त्या चाहत्याला बाहेर काढल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. पण यावरून आता पुन्हा एकदा सुरेक्षेचा मुद्दा उपस्थित राहिला आहे.

विराट कोहली पुन्हा रणजीकडे

भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली हा गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकलेला नाही. तोच नव्हे तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी न्यूझीलंड आणि आस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध खराब कामगिरी केली. त्यानंतर या खेळाडूंनी स्थानिक क्रिकेटकडे वळावे अशी मागणी सातत्याने होत होती. त्यानंतर आता सर्वच दिग्गज खेळाडू रणजीकडे वळले आहेत. भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीही तब्बल 12 वर्षांना रणजी ट्रॉफीमध्ये परतला आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये त्याने शेवटचा रणजी सामना खेळला होता. आता तब्बल 12 वर्षांनंतर तो पुन्हा एकदा रणजीमध्ये खेळताना दिसणार असून त्याची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे गर्दी पाहून दिसत आहेत.