घरक्रीडाVideo : विराटचा नवा लूक तर पहा

Video : विराटचा नवा लूक तर पहा

Subscribe

BCCI ला दिलेल्या मुलाखतीत विराटचा नवा लूक समोर आला आहे.

कोरोना व्हायरसमुळे सध्या बॉलिवूड कलाकारांसह क्रिकेटर देखील आपआपल्या घरात बंद आहेत. पण, सोशल मीडियावर मात्र, बॉलिवूड कलाकारांसह क्रिकेटर चांगलेच Active झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कित्येक जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली देखील मागे नाही. विराट नवनवीन व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्यातच आता विराटचा नवा लूक समोर आला आहे.

BCCI टीव्हीच्या माध्यमातून सलामीवीर मयंक अग्रवाल हा ओपन नेट्स विथ मयंक या कार्यक्रमात विविध क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतो. त्याप्रमाणे आता आगामी मुलाखतीत कर्णधार विराट कोहली याची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा टीझर BCCI च्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये विराटचा ‘रेट्रो’ हा नवा लूक त्याच्या चाहत्यांसमोर आला आहे. दरम्यान, मयंकने विराटच्या गॉगलची स्तुती केल्यानंतर विराटने स्वत:च रेट्रो लूकबद्दल सांगितले आहे.

- Advertisement -

विराट-अनुष्का घालवत आहेत झकास वेळ

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे विराट अनुष्कासोबत आपला झकासपैकी वेळ घालवत आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून विराट-अनुष्काने अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. मात्र, तरी देखील विराट एक गोष्ट मिस करत आहे. विराटने एक छान निसर्गरम्य ठिकाणाचा फोटो पोस्ट करत, ‘मी विविध ठिकाणी फिरणं, भ्रमण करणं मिस करतोय’, असं म्हटलं होतं.

- Advertisement -

हेही वाचा – कसोटीत कोहलीपेक्षा स्मिथ भारी – लबूशेन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -