घरक्रीडाIND vs SL: कोहलीला १०० व्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी, केवळ ३८...

IND vs SL: कोहलीला १०० व्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी, केवळ ३८ धावांची गरज

Subscribe

टी-२० मालिकेनंतर आता भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या(गुरूवार) म्हणजेच ४ तारखेला मोहालीत होणार आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा हा १०० वा कसोटी सामना आहे. अशा स्थितीत हा ऐतिहासिक सामना आणखी खास होणार आहेत. विराट कोहली १०० व्या कसोटीत अनेक मोठे विक्रम करू शकतो.

श्रीलंकेविरूद्धच्या १०० व्या कसोटी सामन्यात ३८ धावा केल्यानंतर विराट कोहली भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारख्या महान खेळाडूंच्या यादीत त्याचा नावाचा समावेश होऊ शकतो. विराटच्या नावावर सध्या ७ हजार ९६२ धावा आहेत. दरम्यान श्रीलंकेविरूद्ध ३८ धावा केल्यानंतर भारतीय संघासाठी ८००० कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश होणार आहे.

- Advertisement -

विराट कोहलीपूर्वी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग, दिलीप वेंगसरकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली आणि कपिल देव यांनी भारतासाठी १०० हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, यापैकी एकाही फलंदाजाने आपल्या १००व्या कसोटीत शतक झळकावलेले नाहीये. किंग कोहली श्रीलंकेविरुद्धच्या १००व्या कसोटीत शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरू शकतो.

बांगलादेशविरुद्ध शेवटचे शतक

विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील शेवटचे शतक बांगलादेशविरुद्ध होते. २०१९ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील शेवटचे शतक झळकावले होते.

- Advertisement -

५० टक्के प्रेक्षक परवानगीचा बीसीआयचा मोठा निर्णय

मागील काही दिवसांपूर्वी भारत आणि श्रीलंकेचा पहिला सामना हा प्रेक्षकांशिवायच खेळवला जाणार असल्याचा निर्णय बीसीसीआने घेतला होता. बीसीसीआयच्या एका निर्णयामुळे या पर्वणीवर विरजण पडल्याचे समजले जात होते. मोहाली आणि आसपासच्या परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बीसीसीआयकडून निर्णय घेण्यात आला होता. परंतु मोहालीतील पहिल्या भारत-श्रीलंका कसोटीसाठी बीसीसीआयने मोहालीच्या पीसीए आयएएस बिंद्रा स्टेडियममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली असून विराटचा १०० वा कसोटी सामना चाहत्यांना पाहता येणार आहे.


हेही वाचा : India Tour of Ireland 2022: टीम इंडिया करणार आयर्लंडचा दौरा, स्टार खेळाडू राहणार मालिकेतून बाहेर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -