घरक्रीडाकोहलीला क्रिकेटच्या पलीकडेही आयुष्य; स्मिथचा भारतीय कर्णधाराला पाठिंबा

कोहलीला क्रिकेटच्या पलीकडेही आयुष्य; स्मिथचा भारतीय कर्णधाराला पाठिंबा

Subscribe

कोहली पितृत्व रजेवर जाणार असून पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या दोन संघांमध्ये होणाऱ्या आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर जाणार असून पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा जानेवारीत त्यांच्या पहिल्या पाल्याला जन्म देणे अपेक्षित आहे. मुलाच्या जन्मावेळी अनुष्कासोबत राहण्यासाठी कोहलीने पहिल्या कसोटीनंतर भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीच्या या निर्णयावर काही जणांनी टीका केली असून अनेकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथने कोहलीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

कोहली हा फारच उत्कृष्ट खेळाडू असून तीन कसोटी सामन्यांत भारतीय संघाला त्याची उणीव नक्कीच भासेल. कोहलीला ऑस्ट्रेलियात खेळायला किती आवडते हे मला ठाऊक आहे आणि त्याची ऑस्ट्रेलियातील कामगिरी अप्रतिम आहे. मात्र, तोसुद्धा माणूस असून त्याला क्रिकेटच्या पलीकडेही आयुष्य आहे. त्यामुळे पहिल्या पाल्याच्या जन्मावेळी पत्नीसोबत राहण्याचा कोहलीने जो निर्णय घेतला आहे, त्याबद्दल त्याचे कौतुक केले पाहिजे, असे स्मिथ म्हणाला.

कोहली अ‍ॅडलेड येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत मात्र खेळणार आहे. प्रकाशझोतात (डे-नाईट) होणाऱ्या या सामन्याची स्मिथ आतुरतेने वाट पाहत आहे. अ‍ॅडलेड हे जगातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियम्सपैकी एक आहे. अ‍ॅडलेड येथे खासकरून डे-नाईट सामना खेळताना खूप मजा येते. त्यामुळे गुलाबी चेंडूने होणाऱ्या भारताविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत खेळण्यास मी उत्सुक आहे, असे स्मिथने नमूद केले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -