घरक्रीडाकुलदीप किंवा जाडेजाला खेळवण्याचा विराटचा विचार

कुलदीप किंवा जाडेजाला खेळवण्याचा विराटचा विचार

Subscribe

दुसरी टेस्ट मॅच आज अर्थात ९ ऑगस्टपासून सुरु होत आहे. दोन स्पिनर्सना मैदानात उतरवण्याचा विचार नक्कीच चांगला आहे असं मत विराटनं व्यक्त केलं आहे.

भारतीय टीमचा कॅप्टन विराट कोहलीच्या म्हणण्याप्रमाणे पहिली टेस्ट मॅच हरली असली तरीही दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये बॅट्समननी आपलं मानसिक बळ चांगलं करून खेळण्याची गरज आहे. पहिल्या मॅचमध्ये विराटशिवाय कोणताही बॅट्समन खेळू शकला नव्हता. एजबेस्टनमध्ये टीम इंडिया केवळ ३१ रन्सनं हरली. दुसरी टेस्ट मॅच आज अर्थात ९ ऑगस्टपासून सुरु होत आहे. या मॅचमध्ये मागील मॅचमधील चुका टाळून सिरीज बरोबरत आणण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न असेल.

कुलदीप आणि जाडेजाला खेळवायचे संकेत

लॉर्ड्सवर दोन्ही स्पिनर्सना उतरावयचे संकेत भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं दिले आहेत. नेहमीप्रमाणेच विराटनं काहीही स्पष्ट नावं घेतलेली नाहीत. मात्र मॅचमध्ये दोन स्पिनर्सना वापरणार का? या प्रश्नावर ‘सध्या विकेट बघितल्यास कोरडी असून लॉर्ड्समध्ये काही महिन्यांपासून गरम वातावरण आहे. त्यामुळं पीचवर बॅट्समन, जलदगती बॉलर्स आणि स्पिनर्ससाठी काही ना काहीतर खाद्य नक्कीच असणार. दोन स्पिनर्सना मैदानात उतरवण्याचा विचार नक्कीच चांगला आहे, मात्र टीमचं संतुलनदेखील आम्हाला सांभाळावं लागेल,’ असं विराटनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, खराब बॅटिंगसंदर्भात ‘कोणत्याही गोष्टीवर इतक्या लवकर निष्कर्ष काढणं योग्य नाही. इतर लोकांपेक्षा एक टीम म्हणून आमचं मनोधैर्य जास्त असतं. आम्ही कोणत्याही गोष्टीवर लगेच निष्कर्ष काढत नाही. विकेट जाणं हे टेक्निकल नाही तर मानसिक जास्त असतं,’ असं विराटनं परखड मत मांडलं. विशेषतः पहिल्या ३० बॉल्समध्ये तुमची स्ट्रॅटेजी काय असणार याकडे जास्त लक्ष देऊन शांत राहण्याची गरज आहे असंही विराटनं म्हटलं आहे.

- Advertisement -

इंग्लंडकडून ओली पोपचं पदार्पण

इंग्लंडच्या कॅप्टन जो रूटनं २० वर्षाच्या ओली पोपच्या पदार्पणाची घोषणा केली असून भारताविरुद्धदेखील त्याची ही पहिली टेस्ट आहे. या टेस्ट मॅचमध्ये खेळण्याच्या संधीचा त्यानं फायदा उचलावा अशी शुभेच्छा विराटनं पोपला दिल्या. दरम्यान दोन्ही टीमकडून अंतिम संघाची घोषणा ही मॅचच्या आधी करण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -