Virat kohli : दक्षिण आफ्रिका विरोधातील पराभवानंतर विराट कर्णधार पद सोडणार हे अपेक्षित होत, सुनील गावस्करांचा गौप्यस्फोट

विराट कोहली कसोटी संघासाठी सर्वात उत्तम कर्णधार आहे. त्याने केलेले रिकॉर्ड याबाबतचे स्पष्टीकरण देत आहेत. ६८ सामन्यांमध्ये विराटने संघाचे नेतृत्व केलं असून ४० सामन्यांमध्ये विजय मिळवला, असे सुनील गावस्कर म्हणाले आहेत.

Virat kohli i am not surprised sunil gavaskar reaction on virat kohli test team captaincy resign
Virat kohli : दक्षिण विरोधातील पराभवानंतर विराट कर्णधार पद सोडणार हे अपेक्षित होत, सुनील गावस्करांचा गौप्यस्फोट

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आईसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत भारताचा २-१ अशा फरकाने पराभव झालाय. कसोटी मालिकेत पराभवाला समोरे जावे लागल्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीने कर्णधार पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. विराट यापूर्वीच टी-२० आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कर्णधार पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाला आहे. कसोटी सामन्यांतील कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती विराटने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. यामुळे अनेक जणांना धक्का बसला आहे. परंतु माजी खेळाडू सुनील गावस्कर यांना आश्चर्य वाटले नाही तर हे अपेक्षित होते असे त्यांनी म्हटलं आहे.

माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी मुलाखतीमध्ये विराट कोहलीने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, मी हे ऐकूण अजिबात आश्चर्यचकित झालो नाही. मला वाटले होते की, सामना पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीमध्ये विराट कर्णधारपद सोडण्याबाबत घोषणा करेल. परंतु तेव्हा जर त्याने तसे केले असते तर तो रागात असल्यामुळे घोषणा केली असे वाटले असते. परंतु त्याच्या निर्णयामुळे मला आश्चर्य वाटले नाही. कर्णधार पद सोडण्याबाबत गावस्कर म्हणाले की, विराट कोहलीला असे वाटले असावे की, दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे कर्णधारपदावरुन हटवण्यात येईल. यामुळे त्याने स्वतः निर्णय घेतला असावा.

कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी असा अंदाज लावण्यात येत होता की, भारतीय संघ ही मालिका ३-० अशा फरकाने विजयी होईल. परंतु भारताला १-२ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. यामुळे निर्णय होण गरजेचे होते. भारताला आता श्रीलंकेविरोधात सिरीज खेळायची आहे. यामुळे टीमला नवीन कर्णधार शोधणे सोपे होईल. तसेच विराट कोहली कसोटी संघासाठी सर्वात उत्तम कर्णधार आहे. त्याने केलेले रिकॉर्ड याबाबतचे स्पष्टीकरण देत आहेत. ६८ सामन्यांमध्ये विराटने संघाचे नेतृत्व केलं असून ४० सामन्यांमध्ये विजय मिळवला, असे सुनील गावस्कर म्हणाले आहेत.


हेही वाचा : Novak Djokovic Out Of Australian Open: नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन मुकणार, ३ वर्षांची बंदी कायम