Homeक्रीडाVirat Kohli : 12 वर्षांनी आला अन् 6 वर बाद झाला, पहिल्या...

Virat Kohli : 12 वर्षांनी आला अन् 6 वर बाद झाला, पहिल्या रणजी सामन्यात कोहलीची कामगिरी

Subscribe

नवी दिल्ली : यंदाची रणजी ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडू खेळत असून सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष हे या सामन्यांकडे लागले आहे. अनेक वर्षांनंतर विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात खेळणारे खेळाडू रणजीमध्ये खेळताना दिसत आहेत. भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली हादेखील दिल्ली संघाकडून खेळत आहे. 30 जानेवारीपासून सुरू झालेल्या रेल्वेविरुद्धच्या सामन्यात 12 वर्षानंतर पुन्हा एकदा विराट कोहली हा रणजी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. त्याला पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडीयमवर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. पण, क्षेत्ररक्षण झाल्यानंतर शुक्रवारी (31 जानेवारी) फलंदाजीसाठी उतरलेल्या विराटने उपस्थित चाहत्यांची मोठी निराशा केली. (Virat Kohli in his first Ranji Trophy out on 6 runs)

हेही वाचा : U-19 WC Final 2025 : आफ्रिकेनंतर भारतीय महिलांचीही अंतिम फेरीत धडक, इंग्लंडचा उडवला धुव्वा 

दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यात सुरू असलेल्या रणजी सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विराट कोहलीदेखील क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला होता. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी रेल्वेचा संघ 241 वर सर्वबाद झाला. यावेळी दिल्लीच्या संघाने 78 वर 2 बाद अशी अवस्था असताना विराट कोहली मैदानात उतरला. तब्बल 12 वर्षानंतर विराट दिल्ली संघाकडून खेळणार असल्याने सर्वांनाच तो चांगली फलंदाजी करेल, अशी अपेक्षा होती. त्याने एक चौकार मारत उपस्थिती चाहत्यांच्या अपेक्षाही वाढवल्या. पण, हिमांशू संगवानच्या अचूक माऱ्यासमोर त्याचा त्रिफळा उडाला आणि तो अवघ्या 6 धावा करून तंबूत परतला. यामुळे आता सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होताना दिसत आहे. तसेच, त्याच्या फॉर्मच्या बाबतीतही अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत.

दुसरीकडे, सौराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला शतकाला हुलकावणी दिली. अवघ्या एका धावेने त्याचे शतक हुकले. त्याने 167 चेंडूत 10 चौकारांसह 99 धावांची खेळी केली. तसेच, मुंबई आणि मेघालय यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने 96 धावा केल्या. त्याने 177 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकारासह या धावा केल्या. 4 धावांनी त्याचे शतक हुकले. यावेळी मेघालयाला 86 धावांवर सर्वबाद केल्यानंतर मुंबई संघाने दुसऱ्यादिवशी टी टाईमपर्यंत तब्बल 508 धावा केल्या आहेत.