घरक्रीडाटेस्ट रँकिंगमध्ये विराट कोहली झाला नंबर १

टेस्ट रँकिंगमध्ये विराट कोहली झाला नंबर १

Subscribe

तिन्ही फॉर्मेटमध्ये भारतातील सर्वश्रेष्ठ रँकिंग विराट कोहलीनं मिळवलं आहे. क्रमांक १ च्या रँकिंगमध्ये विराटनं ऑस्ट्रेलियाचा पूर्व कॅप्टन स्टिव्ह स्मिथला पिछाडीवर सोडलं आहे.

विराट कोहली बॅटिंगमध्ये एकामागोमाग एक रेकॉर्ड बनवत जात आहे. आता टेस्ट क्रिकेटमध्येही विराटनं एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. टेस्ट मॅचमध्ये आता विराट क्रमांक १ चा बॅट्समन झाला आहे. क्रमांक १ च्या रँकिंगमध्ये विराटनं ऑस्ट्रेलियाचा पूर्व कॅप्टन स्टिव्ह स्मिथला पिछाडीवर सोडलं आहे. सध्या स्टिव्ह स्मिथवर बॉल टॅम्परिंगमुळं एक वर्षाची बंदी आहे. मात्र विराटनं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये २०० रन्स बनवून ही जागा पटकावली आहे. त्यामुळं आता टेस्ट रँकिंगमध्येही विराट बादशाह बनला आहे.

सचिन तेंडुलकर आणि गावस्करांनाही टाकलं मागे

विराट कोहलीनं रेटिंगच्या या शर्यतीत टीम इंडियाचे पूर्वधुरंधर बॅट्समन सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर या दोघांनाही रेकॉर्डमध्ये मागे टाकलं आहे. विराट कोहलीला यावेळी आयसीसी रेटिंगमध्ये ९३४ रेटिंग मिळालं असून कोणत्याही भारतीय क्रिकेटरद्वारे मिळवण्यात आलेलं सर्वात जास्त असणारं रेटिंग आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांनी क्रिकेटमध्ये १९७९ मध्ये ९१६ रेटिंग मिळवले होते. तर सचिन तेंडुलकरनं २००२ मध्ये ९८९ इतकं रेटिंग मिळवलं होतं. राहुल द्रविडला २००५ मध्ये ८९२ इतकं रेटिंग मिळालं होतं. विराट कोहली सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. त्यानं तिन्ही फॉर्मेटमध्ये भारतातील सर्वश्रेष्ठ रँकिंग मिळवलं आहे. अर्थात त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये ९३४ रँकिंग मिळालं असून वनडेमध्ये ९११ इतकं रेटिंग आहे आणि २०१४ मध्ये विराटला टी २० मध्ये ८९७ इतकं रेटिंग मिळालं होतं.

- Advertisement -

आयसीसी रँकिंगनुसार, टेस्ट क्रिकेटमध्ये पाच अव्वल बॅट्समन

१. विराट कोहली, भारत – ९३४
२. स्टिव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलिया – ९२९
३. जो रूट, इंग्लंड – ८६५
४. केन विलयमसन, न्यूझीलंड – ८४७
५. डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया – ८२०

सचिननंतर कोहली हा दुसरा भारतीय बॅट्समन

टेस्ट रँकिंगमध्ये पहिला क्रमांक मिळवणारा सचिन तेंडुलकरनंतर दुसरा भारतीय बॅट्समन ठरला आहे. सचिननंतर कोणत्याही भारतीय बॅट्समनला हा मान मिळवता आला नव्हता. २०११ मध्ये सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॅक कॅलिस हे क्रमांक एकचे बॅट्समन होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -