घरक्रीडाकसोटी क्रमवारीत विराटची घसरण, स्मिथ नंबर वन

कसोटी क्रमवारीत विराटची घसरण, स्मिथ नंबर वन

Subscribe

विराट कोहलीची फलंदाजांच्या क्रमावारीत घसरण झाली असली तरी, ३ भारतीय फलंदाजांनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यातील खराब फलंदाजीचा फटका टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला पडला आहे. विराटच्या कसोटी क्रमावारीवरही परिणाम झाला असून कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या क्रमावारीत त्याची पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. या क्रमवारीत ९११ गुणांसह स्टीव्ह स्मिथ अव्वल स्थानी असून विराट ९०६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला. दोन्ही डावांमध्ये भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याचा सामना करु शकले नाहीत. भारतावर डावाने पराभव स्विकारण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि डावखुऱ्या ऋषभ पंतने ही नामुष्की टाळली. भारताचा कर्णधार विराट कोहलीही पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत सपशेल अपयशी ठरला. यामुळे त्याला  फटका बसला आहे.

- Advertisement -

विराट कोहलीची फलंदाजांच्या क्रमावारीत घसरण झाली असली तरी, ३ भारतीय फलंदाजांनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. दोन्ही डावांमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा भेदक माऱ्याचा नेटाने सामना करणाऱ्या मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांना बढती मिळाली आहे. मयंकची १२ व्या स्थानावरुन दहाव्या स्थानावर बढती झाली आहे, तर अजिंक्य नवव्या स्थानावरुन आठव्या स्थानावर आला आहे.

दरम्यान, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपले अव्वल स्थान कायम राखण्यासाठी दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवणे गरजेचे आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा सामना २९ फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्चच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -