घरIPL 2020IPL 2020 : विराट कोहलीला चाहत्यांची उणीव भासतेय - स्टायरिस

IPL 2020 : विराट कोहलीला चाहत्यांची उणीव भासतेय – स्टायरिस

Subscribe

कोहलीने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ९ सामन्यांत ३४७ धावा केल्या आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदा युएईमध्ये होणारी आयपीएल स्पर्धा प्रेक्षकांविना होत आहे. भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ असल्याने भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये सामने खेळण्याची सवय आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमधील अनुभव खेळाडूंसाठी नवा आहे. खेळाडू प्रेक्षकांविनाही चांगला खेळ करत असले, तरी विराट कोहलीसारख्या खेळाडूंना चाहत्यांची उणीव नक्कीच भासत आहे, असे न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसला वाटते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार असणाऱ्या कोहलीने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ९ सामन्यांत ३४७ धावा केल्या असून यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

चाहत्यांकडून ऊर्जा मिळते

यंदाचे आयपीएल रिकाम्या स्टेडियममध्ये होत आहे आणि हा अनुभव खेळाडू व प्रेक्षकांसाठी नवा आहे. विराट कोहलीसारखा खेळाडू किंवा चेन्नई सुपर किंग्ससारख्या संघाला चाहत्यांकडून ऊर्जा मिळते. ते प्रेक्षकांच्या दबावात आपला खेळ उंचावतात. चाहते स्टेडियममध्ये आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी येतात आणि कोहलीसारख्या खेळाडूंना या चाहत्यांचे मनोरंजन करायचे असते, असे स्टायरिस म्हणाला.

- Advertisement -

आतापर्यंतचे सामने चुरशीचे

खेळाडू आणि चाहते यांच्या आरोग्याला धोका उद्भवू नये म्हणून यंदाचे आयपीएल प्रेक्षकांविना होत आहे. मात्र, याचा सामन्यांवर फारसा परिणाम झाल्याचे पाहायला मिळालेले नाही. आतापर्यंतचे सामने चुरशीचे झाले असून प्रमुख खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ करताना दिसत आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत ३८ सामने झाले असून यातील चार सामन्यांचे निकाल सुपर ओव्हरमध्ये लागले आहेत. मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या होत्या, ज्यात किंग्स इलेव्हन पंजाबने बाजी मारली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -