घरक्रीडाICC T20 Rankings : राहुल तिसऱ्या स्थानावर; विराटला एका स्थानाची बढती 

ICC T20 Rankings : राहुल तिसऱ्या स्थानावर; विराटला एका स्थानाची बढती 

Subscribe

तिसऱ्या स्थानावरील राहुलच्या खात्यात ८१६ गुण आहेत.

भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने आयसीसी टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान कायम राखले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या क्रमवारीनुसार, भारताचा कर्णधार विराट कोहलीला एका स्थानाची बढती मिळाली असून तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा डाविड मलान (९१५ गुण) आणि पाकिस्तानचा बाबर आझम (८२० गुण) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तिसऱ्या स्थानावरील राहुलच्या खात्यात ८१६ गुण आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत एक अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे त्याने तिसरे स्थान कायम राखले.

फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा सलामीवीर टीम सायफर्टला तब्बल २४ स्थानांची बढती मिळाली असून तो नवव्या स्थानावर पोहोचला आहे. नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांत सायफर्टने सर्वाधिक १७६ धावा केल्या होत्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. या दमदार कामगिरीच्या जोरावर सायफर्टलातब्बल २४ स्थानांची बढती मिळाली. गोलंदाजांमध्ये भारताचा एकही गोलंदाज अव्वल १० मध्ये नाही. भारताचा वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजांमध्ये १२ व्या स्थानावर असून त्याचे ६१४ गुण आहेत. या यादीत राशिद खान आणि मुजीब उर रहमान हे अफगाणिस्तानचे गोलंदाज अव्वल दोन स्थानांवर आहेत. राशिदचे ७३६, तर मुजीबचे ७३० गुण आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -