IND vs SA: कसोटीत टॉस जिंकत विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड, विशिष्ट यादीत नावाची नोंद

टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टॉस जिंकत नवा रेकॉर्ड केलाय. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आजपासून तिसऱ्या कसोटीचा सामना केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. यामध्ये टीम इंडियाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉस जिंकत विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉसोबत बरोबरी केली आहे. सर्वाधिक टॉस जिंकण्यात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. परंतु कोहलीने ३१ वेळा कसोटी सामन्यात टॉस जिंकला आहे. त्यामुळे त्याने टॉसमध्ये स्टीव्ह वॉची बरोबरी केली आहे.

ग्रीम स्मिथने कर्णधारपदी असताना आपल्या कारकिर्दीत ६० कसोटी सामने जिंकला आहे. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एॅलेन बॉर्डर आहे. तसेच त्याने ४६ कसोटी सामन्यांमध्ये टॉस जिंकले आहेत. न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने देखील कर्णधारपदाच्या कारकिर्दीत ३७ कसोटी सामन्यांमध्ये ३७ वेळा टॉस जिंकला आहे.

विराटने कसोटीत ३० पेक्षा अधिक टॉस जिंकले

वेस्टइंडिजचा माजी कर्णधार क्लाईव्ह लॉयड आणि इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने देखील ३५ कसोटी सामन्यांपैकी ३५ वेळा टॉस जिंकलं आहे. विराटने कसोटी सामन्यांमध्ये ३० पेक्षा अधिक टॉस जिंकले असून त्याने विशिष्ट यादीमध्ये सातव्या क्रमांकावर नावाची नोंदणी केली आहे.

दरम्यान, विराटच्या कारकिर्दीतील ९९ वा कसोटी सामना आहे. कोहलीचा हा ६८ वा कसोटी सामना आहे. कोहलीने कर्णधारपदाच्या कारकिर्दीत ४० कसोटी सामने जिंकले आहेत. तर १६ वेळा संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.


हेही वाचा : IND vs SA: भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर कोरोना पॉझिटिव्ह, वनडे मालिकेत खेळण्यावर शंका