घरक्रीडाODI Rankings : फलंदाजांमध्ये कोहली अव्वल, गोलंदाजांत बुमराह तिसऱ्या स्थानी 

ODI Rankings : फलंदाजांमध्ये कोहली अव्वल, गोलंदाजांत बुमराह तिसऱ्या स्थानी 

Subscribe

रोहित शर्माने फलंदाजांमध्ये दुसरे स्थान राखले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील गोलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान राखले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीनुसार, भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी कायम होते. कोहलीने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ८९, तर तिसऱ्या सामन्यात ६३ धावांची खेळी केली होती. त्यामुळे ८७० गुणांसह तो फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकला. मात्र, असे असतानाही त्याने दुसरे स्थान राखले आहे.

गोलंदाजांमध्ये बुमराह तिसऱ्या स्थानावर असून त्याचे ७०० गुण आहेत. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांत चार विकेट घेतल्या होत्या. गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट ७२२ गुणांसह अव्वल, तर अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान दुसऱ्या स्थानी आहे. तसेच भारताविरुद्ध सहा विकेट मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेझलवूडला एका स्थानाची बढती मिळाली असून तो सहाव्या स्थानी पोहोचला आहे. त्याचे ६६० गुण आहेत. तसेच या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक सात विकेट घेणाऱ्या झॅम्पाने कारकिर्दीत पहिल्यांदा क्रमवारीत अव्वल १५ गोलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे. तो १४ व्या स्थानी आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -