Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा विराट कोहलीने सांगितले पंतच्या उत्तम कामगिरीमागील सत्य, उधळली स्तुतीसुमने

विराट कोहलीने सांगितले पंतच्या उत्तम कामगिरीमागील सत्य, उधळली स्तुतीसुमने

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केले पंतचे कौतुक

Related Story

- Advertisement -

भारतीय संघाने इंग्लंडला चैन्नईमद्ये कसोटी सामन्यात चांगलाच धोबी पछाड दिला आहे. भारतीय संघाने चार कसोटी सामन्यातील २ सामन्यांच्या विजयावर आपले नाव कोरले आहे. यामध्ये पहिली कसोटी इग्लंडने २२७ धावांनी जिंकली होती. तर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने ३१७ धावांनी इग्लंडला हारवले आहे. या सामन्यांत भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने उत्तम विकेकीपिंग केली. पंतच्या विकेटकीपिंगची प्रशंसा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही केली आहे. यावेळी विराटने सांगितले की, ऋषभ पंतने आपली यष्टीरक्षक उत्तम करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचे विराट कोहलीने सांगितले.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पंतचे कौतुक करत म्हटले आहे की, ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियातील सामन्यावेळी खूप मेहनत घेतली आहे. आता त्याच्या यष्टीरक्षणामध्ये खूप फरक दिसतो आहे. तसेच फिट राहण्यासाठी पंतने आपले वजनही कमी केले आहे. त्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय हे त्यालाच जाते. पंतने आपल्या यष्टीरक्षणामध्ये अशीच मेहनत घ्यावी आणि सुधारणा करावी असे भारतीय संघाचेही मत असल्याचे विराटने म्हटले आहे.

- Advertisement -

मागील महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यात ऋषभ पंतने उत्कृष्ट खेळी करत टीम इंडियाला उभारी दिली होती. भारतीय संघाच्या विजयासाठी ऋषभ पंतने केलेली चौफेर फलंदाजीही तिकीच मोलाची आहे. तसेच पंत भारत विरुद्ध इग्लंडच्या सामन्यांतही उत्कृष्ट खेळी दाखवत आहे. तसेच आपल्या विकेटकिपींगच्या जोरावर चाहत्यांचे आणि भारतीय संघाचे मन जिंकण्याचे प्रयत्न ऋषभ पंत करत आहे.

- Advertisement -