घर क्रीडा घराचा खरा 'कॅप्टन' कोण? विराटने केले गुपित उघड

घराचा खरा ‘कॅप्टन’ कोण? विराटने केले गुपित उघड

Subscribe

इटलीमध्ये अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लाखो तरूणींच्या दिलों की धडकन असणाऱ्या विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने गेल्या वर्षी लग्न केले. क्रिकेटमध्ये विराटला पाठिंबा देणे असो वा चित्रपटात केलेल्या भूमिकेची अनुष्कासाठी तारीफ असो, विराट आणि अनुष्का दोघेही एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
सध्या चालू असणाऱ्या आयपीएल मॅचेसमध्ये बंगलोरकडून खेळणाऱ्या विराटला पाठिंबा देताना अनुष्काला बऱ्याच वेळा चाहत्यांनी पाहिले आहे. इतकेच नाही तर आपल्या आयुष्यात अनुष्काचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे विराटने आपल्या प्रत्येक मुलाखतीत आतापर्यंत सांगितले आहे. मात्र हे सगळं असलं तरीही आपल्या घराचा खरा ‘कॅप्टन’ कोण आहे याचं गुपित विराटने एका वेबला दिलेल्या मुलाखतीत उघड केलं आहे.
वेब मुलाखतकाराने प्रश्न विचारला असता चेहऱ्यावर हसू आणत सहज सांगितले की, ‘नक्कीच ती (अनुष्का) घराची कॅप्टन आहे. आयुष्यातील सगळेच महत्त्वपूर्ण निर्णय ती घेते. ती माझी ताकद असून मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा देत असते आणि आपल्या जोडीदाराकडून आपल्याला अजून काय हवं असतं? ती माझ्या आयुष्यात असल्यामुळे मी स्वतःला फारच भाग्यवान समजतो. तिला खेळ कळतो, सर्व खेळांडूंच्या भावनाही तिला पटकन समजतात, मला वाटतं ही तिच्यातील अतिशय चांगली गोष्ट आहे.’
दरम्यान सध्या आयपीएलमधून आरसीबी संघ बाहेर गेला असून इंग्लिश कौंटी खेळण्यासाठी लवकरच विराट कोहली इंग्लंडला रवाना होईल. मात्र अफगाणिस्तान विरोधात टेस्ट मॅच खेळण्यासाठी विराट हजर राहू शकणार नाही.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

- Advertisment -