घरक्रीडाकर्णधार कोहलीचा ‘हा’ सल्ला शुभमन गिलसाठी ठरतोय फायदेशीर!

कर्णधार कोहलीचा ‘हा’ सल्ला शुभमन गिलसाठी ठरतोय फायदेशीर!

Subscribe

कोहली स्वतः युवा खेळाडू असताना त्याला आलेले अनुभव गिलला सांगण्याचा प्रयत्न करतो.

भारताचा कर्णधार विराट कोहली आक्रमक शैलीत आणि निडरपणे खेळण्यासाठी ओळखला जातो. तसेच तो कर्णधार म्हणूनही भारतीय संघातील आपल्या सहकाऱ्यांना निडरपणे खेळण्याचा सल्ला देतो. हा सल्ला भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलसाठी फायदेशीर ठरला आहे. तसेच कोहली स्वतः युवा खेळाडू असताना त्याला आलेले अनुभव गिलला सांगण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट गिलला खेळाडू म्हणून अधिक परिपक्व होण्यासाठी मदत करत आहे. गिलची आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली असून रोहित शर्माच्या साथीने तो भारताच्या डावाची सुरुवात करणे अपेक्षित आहे.

बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात

कोहली नेहमी आम्हाला निडरपणे खेळण्याचा सल्ला देतो. तो आम्हाला आमचा नैसर्गिक खेळ करण्यास सांगतो. त्याचा सल्ला मला नक्कीच फायदेशीर ठरत आहे. तो मला नेहमी प्रोत्साहन देत असतो. मानसिकदृष्ट्या एखाद्या परिस्थितीसाठी किंवा सामन्यासाठी तयार नसल्याचे मला वाटल्यास मी कोहलीसोबत चर्चा करतो. तो केवळ मलाच नाही, तर भारतीय संघातील सर्वच युवा खेळाडूंना त्याचे अनुभव सांगतो. त्याच्या अनुभवांमधून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, असे गिलने एका मुलाखतीत सांगितले.

- Advertisement -

कोहलीच्या आक्रमकपणाची चर्चा

कोहलीच्या आक्रमकपणाबद्दल नेहमीच चर्चा होत असते. काही क्रिकेटपटूंना त्याचा आक्रमकपणा भावतो, तर काही जण त्याच्यावर टीका करतात. काही दिवसांपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कोहलीची स्तुती केली होती. वेगवान गोलंदाज खूप आक्रमक असतात आणि कोहली एखाद्या वेगवान गोलंदाजाप्रमाणेच आक्रमक असल्याचे शमी म्हणाला होता. त्याच्याप्रमाणेच गिलही कोहलीच्या आक्रमकपणाचा चाहता आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -