घरक्रीडाIND vs NZ: न्यूझीलंड विरूद्ध सामन्यासाठी हार्दिक पांड्या फिट, विराट कोहलीची माहिती

IND vs NZ: न्यूझीलंड विरूद्ध सामन्यासाठी हार्दिक पांड्या फिट, विराट कोहलीची माहिती

Subscribe

टी२० विश्वचषकामध्ये पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून दारुण पराभव झाल्यानंतर टीम इंडिया न्यूझलंडविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. सामन्यापुर्वीच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पांड्याच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. हार्दिक पांड्या पूर्णपणे ठिक असून गोलंदाजी करण्याची शक्यता असल्याचे विराट कोहलीने सांगितले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नव्हती त्यामुळे आता पांड्या गोलंदाजी करणार का अशी चर्चा सुरु होती या चर्चांना कोहलीनं पुर्ण विराम दिला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यापुर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये हार्दिक पांड्या सामन्यासाठी फिट असल्याचे सांगितले. तसेच पाकिस्तानने पराभव केल्यानंतर गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रोल करण्यात आले यावरही विराट कोहलीने मत व्यक्त केलं आहे. हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट असून तो सहावा गोलंदाज बनू शकतो परंतु ६ गोलंदांजांसह सामना जिंकू शकत नाही. यामुळे शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्याचा विचार असल्याचे विराट कोहलीने सांगितले.

- Advertisement -

धर्माच्या आधारावर निशाणा करणं चुकीचं

पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर गोलंदाज मोहम्मद शमीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होते. यावर विराट प्रतिक्रिया देताना म्हणाला, आमचे पूर्णपणे लक्ष सामन्यावर आहे. मैदानाबाहेर काय सुरु आहे याकडे लक्ष नाही. काही लोकं सोशल मीडियावर स्वतःची माहिती लपवून टीका करत असतात. सध्या हे होणं सहाजिकच आहे. कोणत्याही व्यक्तिला धर्माच्या आधारावर निशाणा करणं चुकीचे आहे. मी सुद्धा अशा प्रकारे कोणत्या व्यक्तिसोबत वागलो नाही. मोहम्मद शमीमध्ये जर कोणाला खेळासाठी चिकाटी दिसत नसेल तर त्यांच्यावर माझा वेळ वाया घालवण्याची इच्छा नाही असं विराट म्हणाला.


हेही वाचा : T20 World Cup2021: Pak vs AFG और कोई हुकूम पाकिस्तान ? ४ षटकारानंतर अलीचा सवाल

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -