Virat Kohli : विराटच्या निर्णयाची BCCI ला होती पूर्वकल्पना, बोर्डाने ती चूक टाळली

Virat Kohli BCCI

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून अनेक मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. विराटच्या कर्णधार पदाशी संबंधित या घडामोडी आहेत. विराट कोहलीच्या टी २० कर्णधार पदाच्या पायउतार होण्यापासून ते वनडे पाठोपाठ कसोटी क्रिकेटचे कर्णधार पद पाय उतार होण्यापर्यंतच्या निर्णयामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिका पराभवानंतर विराटने घेतलेल्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांसह अनेक दिग्गजही हैराण आहेत. पण विराटचा निर्णय हा बीसीसीआयला यावेळी मात्र धक्कादायक नव्हता. यंदा BCCI च्या वतीने विराटच्या या निर्णयाचा आदर राखत त्याचा कर्णधार पदाचा राजीनामा पहिल्या फटक्यातच स्विकारला गेल्याची माहिती आहे.

विराटच्या दक्षिण आफ्रिकेविरोधातील पराभवाच्या निर्णयानंतर त्याने २४ तासांचा कालावधी घेतला अन् कर्णधार पदावरून पायउतार करत असल्याची घोषणा केली. इंग्रजी वृत्तपत्र टेलिग्राफने दिलेल्या निर्णयानुसार जेव्हा विराट कोहलीने आपल्या राजीनाम्याबाबत बीसीसीआयला माहिती दिली, तेव्हा बीसीसीआयने हा राजीनामा स्विकारला. तसेच विराटला आपल्या निर्णयावर अपिल करण्याचेही सांगण्यात आले नाही. या वृत्तानुसार शनिवारी दुपारीच विराट कोहलीने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाहला आपल्या निर्णयाबाबतची माहिती दिली होती. विराटने याआधीच आपले मन तयार केल्याने बीसीसीआयच्या वतीनेही कोणताही विरोध करण्यात आला नाही.

विराटने शनिवारी सायंकाळी एक ट्विट करत आपण कसोटी कर्णधार पदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले. त्याआधीच विराटने बोर्डाला माहिती दिली होती. पण त्याआधीच बोर्डाला विराटच्या निर्णयाबद्दल माहिती होते. विराटने केपटाऊन टेस्ट समाप्त झाल्यानंतर पहिल्यांदा राहुल द्रविडला आणि इतर सदस्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर विराट कोहली हॉटेलला परतला. मालिका समाप्तीनंतरच विराट कोहली हा निर्णय घेणार याबाबतचे मनही त्याने आधीच बनवले होते. त्यामुळे मॅच संपल्यानंतर टीमशी संवाद विराटने साधला. त्यानंतर बोर्डाला कळवले आणि अखेर ट्विट करून आपण कॅप्टन म्हणूनच पायउतार करत असल्याची माहिती दिली.

काय होती कर्णधार पदावरून पायउतार होण्याची कारणे ?

अहवालातील माहितीनुसार विराट कोहलीची ड्रेसिंग रूममधील लोकप्रियता घटली होती. याआधीचे भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेल्या रवि शास्त्रींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर विराटचा कर्णधार म्हणून दबदबा तुलनेने कमी झाला होता. त्यानंतर टी २० कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली आणखी कमकुवत झाला. गेल्या दोन वर्षात फॉर्मच्या चढउतारामुळे विराटच्या धावांचाही दुष्काळ दिवसेंदिवस वाढतच होता. त्यामुळे विराटसमोरील अडचणी वाढतच होत्या.

याआधी विराटने टी २० चे कर्णधारपद सोडले होते, तेव्हा टी २० वर्ल्डकपच्या आधीच ट्विटरवर ही घोषणा केली होती. त्यावेळी खुद्द बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही असा प्रकार करण्यापासून विराटला रोखले होते. तर मुख्य निवड अधिकार चेतन शर्माने विराटला टी २० वर्ल्ड कपपर्यंत थांबण्याचे आवाहन केले होते. पण असे घडले नाही.