विराट आपल्या दाढीबद्दल कमालीचा सतर्क

virat-kohli-beard
भारतीय कर्णधार विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या स्टाईलबद्दल नेहमीच सजग असतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये विराट आपल्या दाढीचा किती सिरीयस आहे, हे दिसून येते. विकेट किपर के. एल. राहुल याने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. सदर व्हिडिओ खरंतर सीसीटीव्ही फुटेज आहे.

नक्की काय आहे हा व्हिडिओ

या व्हिडिओत विराटचे फोटोशूट करायला काही लोक आलेले दिसतात. फोटोशूट सुरु असताना फोटोग्राफरना विराटच्या दाढीतील काही केस खटकत असतात. हे केस नीट करण्यासाठी फोटोग्राफर प्रयत्न करत असताना, विराट त्यांना जरा सांभाळून काम करण्याची समज देताना दिसत आहे.

काय म्हणतो राहुल

हा व्हिडिओ राहुलने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर टाकला असून याबद्दल राहुलने लिहतो की, “मला आधीपासूनच हे माहित होते की तू तुझ्या दाढीबद्दल किती सतर्क आहेस, हे मला माहित होतंच. या व्हिडिओवरुन त्याची आणखी खात्री पटली”

विराट स्टाईल आयकॉन

विराटला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा २०१६-१७ आणि २०१७-१८चा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे. याचसोबत यंदाच्या फोर्ब्सच्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत खेळांडूमध्येही त्याचा ८३ वा क्रमांक लागला आहे. १०० खेळांडूच्या या यादीत तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याचे नाव यादीत असण्याचे कारण आहे त्याची कोट्यवधींची कमाई. विराटला ही कमाई जाहिरातीतून अधिक मिळते. अनेक मोठ्या ब्रँड्सचा तो ब्रँड अँबेसिडर असून आदिदास, नाईकी, प्युमा यासारख्या मोठ्या ब्रॅंड्सच्या जाहिरातीही करतो. जाहिराती मिळवण्यासाठी तो नेहमीच आपल्या लुकची काळजी घेत असतो. फिटनेसच्या बाबतीतही तो भारतीय संघात अव्वल क्रमांकावर आहे. या सगळ्यांसाठी त्याला आपल्या दाढीच्या केसांबद्दल ही इतके सतर्क राहावे लागते.