घरक्रीडाविराट कोहलीनं रचला नवा रेकॉर्ड

विराट कोहलीनं रचला नवा रेकॉर्ड

Subscribe

विराट कप्तानी आणि बॅटिंगमध्ये नवा रेकॉर्ड आपल्या नावे करत चालला आहे. कॅप्टन म्हणून विराट कोहलीनं जलद ३००० रन्स बनवण्याचा नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

भारत आणि इंग्लंडच्या निर्णायक मॅचमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं नवा रेकॉर्ड रचला आहे. पुन्हा एक नवा तुरा विराटनं आपल्या कामगिरीमध्ये खोचला आहे. विराट कप्तानी आणि बॅटिंगमध्ये नवा रेकॉर्ड आपल्या नावे करत चालला आहे. कॅप्टन म्हणून विराट कोहलीनं जलद ३००० रन्स बनवण्याचा नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. यापूर्वी वनडेमध्ये कॅप्टन म्हणून जलद १००० आणि २००० रन्स बनवण्याचा रेकॉर्डही विराटच्याच नावे होता.

४९ इनिंगमध्ये विराटच्या ३००० रन्स

विराटनं वनडेमध्ये कॅप्टन म्हणून जलदगतीनं ४९ इनिंगमध्ये ३००० रन्स बनवले आहेत. तर केवळ १७ इनिंगमध्येच त्यांनं १००० रन्सचा टप्पा पूर्ण केला होता. तर २००० रन्स बनवण्सासाठी विराटला ३६ इनिंगचा सामना करावा लागला. ३००० रन्स पूर्ण करण्यासाठी विराटला केवळ १२ रन्सची आवश्यकता होती. इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या वनडे मॅचमध्ये १२ रन्स काढून विराटनं हा रेकॉर्डदेखील आपल्या नावे केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शर्यतीत त्यानं निवृत्ती घेतलेल्या एबी डिविलियर्सला आता पिछाडीवर टाकलं आहे. डिविलियर्सनं हा रेकॉर्ड करण्यासाठी ६० इनिंगचा सामना केला होता. तर विराटनं केवळ ४९ इनिंगमध्येच हा रेकॉर्ड बनवला आहे.

- Advertisement -

सर्वात जलदगतीने ३००० रन्स करणारे कॅप्टन्स

खेळाडू              मॅच           इनिंग
विराट कोहली      ५२            ४९
एबी डिविलियर्स    ६३            ६०
एम. एस. धोनी     ८०            ७०
सौरव गांगुली       ७५           ७४
ग्रीम स्मिथ          ८५            ८३

- Advertisement -

तिसऱ्या मॅचमध्ये विराटनं शिखरबरोबर चांगली भागीदारी केली. या दोघांमध्ये आतापर्यंत वनडेमध्ये ४३ इनिंग्जमध्ये ८ शतकी भागीदारी केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -