Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा विराट कोहलीचा विक्रम, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण

विराट कोहलीचा विक्रम, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला विराट कोहलीने उत्तम खेळी केली.

Related Story

- Advertisement -

विराट कोहलीने चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आणखी एक विक्रम आपल्या नावावर करुन घेतला आहे. भारत आणि इग्लंडमध्ये चौथा कसोटी सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात सुरु आहे. तिसऱ्या दिवशी रोहित शर्माने उत्तम खेळी केली तर चौथ्या दिवशी टीम इंडिया कर्णधार रोहित शर्माने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करुन नवा विक्रम केला. अर्धशतकापासून ६ धावांनी दूर असताना विराट कोहली ४४ धावांवर बाद झाल्यामुळे कमालीचा नाराज दिसून आला. मोईन अलीच्या चेंडूवर झेलबाद झाल्यामुळे विराट अर्ध शतकापासून दूर राहिला आणि तंबूत परतला.

विराट कोहली इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीमध्ये शतक पुर्ण करेल असा चाहत्यांना आशा होत्या मात्र विराट ४४ धावांवर बाद झाल्यामुळे चाहत्यांच्या आशा मावळल्या आहेत. झेलबाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर विराट कोहलीच्या देहबोलीवरुन कमालीची नाराजी दिसत होती. मात्र विराटने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी ४४ धावा करुन प्रथम श्रेणी कारकिर्दीत १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२७ सामन्यांत यापुर्वी विराटने ९९२० धावा केल्या होत्या तर आताच्या सामन्यात पहिल्या डावात ५० तर दुसऱ्या डावात ४४ अशा धावा करत प्रथम श्रेणीमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

- Advertisement -

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला विराट कोहलीने उत्तम खेळी केली. विराटसोबत जडेजाही चांगला सेट झाला होता परंतु वोक्सने जडेजाला पायचीत तरुन १७ धावांवर तंबूत पाठवले. जडेजानंतर अजिंक्य राहणे फारशी चांगली खेळी करु शकला नसून शून्यावर माघारी परतला. अजिंक्य रहाणे मागील २७ डावांमध्ये दोन अर्धशतकं, एक शतक झळकावले असून ३ वेळा खांत न उघडताच माघारी परतला आहे.

रवी शास्त्रींना कोरोनाची लागण

चौथ्या दिवशी इग्लंडसमोर आव्हान उभं करण्याचे लक्ष टीम इंडियाचे होते मात्र त्यापुर्वीच संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह ४ प्रशिक्षकांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, यामुळे बीसीसीआय वैद्यकीय पथकाने गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरेपिस्ट नितीन पटेल या चारही प्रशिक्षकांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. या प्रशिक्षकांना सध्या भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे मात्र त्यांना संघासोबत प्रवास करता येणार नाही.


- Advertisement -

हेही वाचा : दिव्यांग असल्याने, देवाने माझ्याबरोबरचं असं का केलं….सिल्वर मेडल जिंकल्यानंतर DM सुहासची प्रतिक्रिया


 

- Advertisement -