IPL 2022 : मुंबईच्या विजयानंतर RCBचं जंगी सेलिब्रेशन, विराट कोहलीचं ट्विट व्हायरल

Virat Kohli's tweet goes viral and RCB's wild celebration after Mumbais victory
IPL 2022 : मुंबईच्या विजयानंतर RCBचं जंगी सेलिब्रेशन, विराट कोहलीचं ट्विट व्हायरल

आयपीएल 2022 च्या 69 व्या सामन्यात मुंबईच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत पराभव केला आहे. विजयानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, आम्हाला माहिती आहे की, काही संघ आमच्या विजयाकडे लक्ष ठेवून होते. आम्ही आमचा शेवटचा सामना विजयी करण्यासाठी खेळत होतो. रोहित शर्माच्या वक्तव्यामध्ये तथ्य होते कारण मुंबईचा विजय व्हावा असे आरसीबीला वाटत होते. मुंबईचा विजय होताच आरसीबीच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आरसीबीकडून जंगी सेलिब्रेशनसुद्धा करण्यात आले आहे. यानंतर विराट कोहलीने केलेलं ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. दरम्यान आरसीबीच्या संघाकडून थँक यू असे मुंबईच्या संघाला बोलण्यात आले आहे.

मुंबईच्या संघाने आपला यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना विजयी केला आहे. तसेच आरसीबीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरसीबीने आपल्या यंदाच्या हंगामातील सगळे सामने खेळले आहेत. आरसीबीला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईचा दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवणं महत्त्वाचे होते. दिल्लीचा पराभव झाल्यामुळे आरसीबीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या हायप्रोफाईल सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेट्सने मात केली आणि यासह RCB संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ ठरला आहे. आता एलिमिनेटर सामन्यात त्याचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. आरसीबीने साखळी सामन्यात चांगला खेळ केला पण त्यांच्या कामगिरीत सातत्य राहिले नाही, ज्यामुळे त्यांचे प्लेऑफचे समीकरण इतर संघांवर अवलंबून राहिले. येथे विराट कोहलीला रोहित शर्माची पूर्ण मदत हवी होती आणि रोहितने आपले काम दाखवून दिले आहे.

मुंबईच्या विजयानंतर आरसीबीचे सेलिब्रेशन

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर आरसीबीकडून आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मुंबईचे आभार मानन्यात आले आहेत. तसेच आरसीबीच्या खेळाडूंचे जंगी सेलिब्रेशनची झलक दाखवण्यात आली आहे. खेळाडूंचे सेलिब्रेशन फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. तसेच विराट कोहलीनेही ट्विट करत आभार व्यक्त केले आहेत. मुंबईच्या विजयामुळे आरसीबी प्लेऑफमध्ये दाखल झाली आहे.


हेही वाचा : राज सभेच्या पूर्वसंध्येला वसंत मोरेंचं फेसबुक लाईव्ह, MNS पार्ट टाईम कार्यकर्त्यांविरोधात नाराजी व्यक्त