रोहित शर्माच्या टी-२० कर्णधारपदाबाबत विरेंद्र सेहवागचं मोठं वक्तव्य

Virender Sehwag

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने भारताचा कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं व्यक्तव्य केलं आहे. रोहित शर्मा ३५ वर्षाचा असल्यामुळे त्याच्यावरील भार थोडा कमी केला पाहीजे. त्यामुळे त्याची टी-२० कर्णधारपदाच्या कार्यातून मुक्तता केली पाहीजे, असं विरेंद्र सेहवागने म्हट्लं आहे.

विरेंद्र सेहवागने एका वेबसाईटशी संवाद साधला. त्यावेळी सेहवाग म्हणाला की, जर टी-२०साठी भारतीय संघ व्यवस्थापनाच्या मनात अजून कोणी असेल तर मला असे वाटते की, रोहित शर्माला या कार्यभारातून मुक्त करून दुसऱ्या व्यक्तीला टी-२० संघाचे कर्णधारपद द्यायला हवे.

रोहित शर्माचे वय पाहता त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंट आणि मानसिक थकव्यावर चांगले काम करता येईल. टी-२० संघासाठी दुसरा कर्णधार नियुक्त केला तर रोहित शर्माला टी-२० मधून ब्रेक घेणे सोपे जाईल. त्याचप्रमाणे कसोटी आणि वनडेसाठी चांगल्या प्रकारे तयारी करता येईल, असं विरेंद्र सेहवाग म्हणाला.

जर एकच व्यक्ती भारताच्या तीनही प्रकारातील संघाचा कर्णधार असेल आणि या योजनेनुसारच जाणार असेल तर मला असे वाटते की, रोहित शर्माच यासाठी योग्य व्यक्ती आहे. जर संघ व्यवस्थापनाने भारताच्या तीनही प्रकारात एकच कर्णधार असावा असे ठरवले असेल, तर रोहित शर्मा शिवाय दुसरा पर्याय सध्या तरी समोर दिसत नाही, असं सेहवाग म्हणाला.


हेही वाचा : मध्य प्रदेशने रचला इतिहास, पहिल्यांदाच जिंकली रणजी ट्रॉफी; मुंबईचा पराभव