घर क्रीडा Virender Sehwag : विश्वचषकात खेळाडूंच्या जर्सीवर 'हे' नाव असावं; सेहवागच्या मागणीने वाद...

Virender Sehwag : विश्वचषकात खेळाडूंच्या जर्सीवर ‘हे’ नाव असावं; सेहवागच्या मागणीने वाद होणार?

Subscribe

Virender Sehwag : भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी (ICC Cricket World Cup 2023) भारतीय संघाची आज (5 सप्टेंबर) घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेत पत्रकार परिषद घेत भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्वीट करताना म्हटले की, 2023 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघ असा असेल. पण भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) बीसीसीआयचे फारसे आवडलेले दिसत नाही. त्याने ट्वीट करताना विश्वचषकात आपल्या खेळाडूंच्या जर्सीवर नवीन नावाची मागणी बीसीसीआयकडे केली आहे. मात्र सेहवागच्या ट्वीटने सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही जुंपली आहे. (Virender Sehwag Players jerseys should have the ‘this’ name in World Cup Sehwags demand will be controversial)

वीरेंद्र सेहवागने ट्वीट करताना म्हटले की, भारतीय संघाच्या जर्सीवर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असे लिहावे. कारण इंडिया हे नाव ब्रिटिशांनी दिले आहे. त्यामुळे ते नाव बदलावे. याशिवाय विश्वचषकासाठी जाहीर करण्यात भारतीय संघावरही त्याने बीसीसीआयला ट्रोल केले आहे. त्याने म्हटले की, ही टीम इंडिया नाही, भारत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ICC Cricket World Cup 2023 : भारतीय संघाची घोषणा; चार खेळाडू खेळणार पहिला विश्वचषक, वाचा कोण?

सेहवागने आधीच्या ट्वीटमध्ये म्हटले की, माझा नेहमीच विश्वास आहे की नाव असे असले पाहिजे जे आपल्यामध्ये अभिमान निर्माण करेल. आम्ही भारतीय आहोत, इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिलेले आहे. आमचे मूळ नाव ‘भारत’ परत मिळण्यास बराच वेळ लागला आहे. त्यामुळे मी बीसीसीआय आणि जय शाह यांना विनंती करतो की, या विश्वचषकात आमच्या खेळाडूंच्या जर्सीवर भारत असे नाव असावे.

- Advertisement -

या संघानीही आपले नाव बदलले

सेहवागने उदाहरणे देताना म्हटले की, 1996 विश्वचषकात नेदरलँड्स हॉलंडच्या रूपात विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता. जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत 2003 मध्ये खेळलो तेव्हा त्याचे नाव नेदरलँड्स होते आणि आताही ते कायम आहे.”बर्मा यांनी ब्रिटीशांनी म्यानमारला दिलेले नाव बदलले आहे. इतर अनेक देश त्यांच्या मूळ नावांवर परत गेले आहेत. त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये जेव्हा आपण कोहली, रोहित, बुमराह, जडेजा यांची नावं घेणार, तेव्हा आशा करतो की, आपल्या हृदयात भारत असेल आणि खेळाडूंनी भारत लिहिलेली जर्सी घालावी, अशी मागणी सेहवागने केली आहे.

हेही वाचा – Asia Cup 2023 : भारत- पाकिस्तान पुन्हा भिडणार; ‘या’ दिवशी होणार सामना, पाहा वेळापत्रक

सेहवागच्या मागणीने राजकारणही तापले

सेहवागने सोशल मीडियावर केलेले ट्वीट अनेकांचे लक्ष वेधताना दिसत आहे. आता देशाचे नाव इंडिया नसून भारत असे होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र सेहवागच्या मागणीने राजकारणही तापताना दिसत आहे. राजकीय नेतेमंडळी आपापली प्रतिक्रिया देत असून विरोधक भाजपावर टीकास्त्र करताना दिसत आहेत. सेहवागच्या मागणीने सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही जुंपली आहे.

- Advertisment -