घरक्रीडाIPL 2021 : सेहवाग २२ वर्षीय वेगवान गोलंदाजाचा झाला फॅन, म्हणाला टीम...

IPL 2021 : सेहवाग २२ वर्षीय वेगवान गोलंदाजाचा झाला फॅन, म्हणाला टीम इंडियाचे भविष्य

Subscribe

पंजाब किंग्जचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग लवकरच भारतीय संघात दिसेल, असे भाकित भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने केले आहे. अर्शदीप हा एक प्रतिभावान गोलंदाज असून बीसीसीआयने त्याची प्रतिभा वाया जाऊ देऊ नये, असे सेहवागने म्हटले आहे. अर्शदीप सिंगने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात चमकदार कामगिरी केली आहे.

अर्शदीप ज्या संघासाठी खेळेल त्याच्यासाठी तो फायदेशीर ठरेल. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाचा चेंडू ज्या प्रकारे ऑफ स्टंपपासून दूर पडतो आणि आत येतो, त्याच पद्धतीने अर्शदीप सिंग गोलंदाजी करत आहे. त्याने झहीर खानसोबत फक्त तीन दिवस काम केले. जर तो इतक्या कमी वेळात चेंडू स्विंग करायला शिकू शकतो, तर तुम्ही कल्पना करू शकता की जर तो भारतीय संघासोबत राहिला तर तो इतका फायदा आणू शकेल. अशा परिस्थितीत अर्शदीपची प्रतिभा नष्ट होणार नाही याची पूर्ण काळजी बीसीसीआयने घ्यावी, असे सेहवागने म्हटले आहे.

- Advertisement -

सेहवाग म्हणाला की जर अर्शदीप त्याच्या गोलंदाजीवर असेच मेहनत करत राहिला तर तो लवकरच भारतासाठी खेळू शकतो. अर्शदीप एक महान गोलंदाज आहे आणि तो आता ज्या पद्धतीने खेळत आहे, तो दिवस दूर नाही जेव्हा तो भारतासाठी गोलंदाजी करताना दिसेल.

अर्शदीपने आतापर्यंत आयपीएल २०२१ मध्ये १० सामन्यांमध्ये १६.५६ च्या सरासरीने १६ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. त्याचा स्ट्राइक रेटही उत्कृष्ट आहे. अर्शदीपने दुबईत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ३२ धावांत ५ विकेट घेतल्या. या हंगामात अशी कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज ठरला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -