घर क्रीडा Virender Sehwag : गंभीरच्या आधी तू खासदार झाला असता; राजकारणावर भाष्य करताना...

Virender Sehwag : गंभीरच्या आधी तू खासदार झाला असता; राजकारणावर भाष्य करताना वीरुने जिंकली मने

Subscribe

Virender Sehwag : राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 डिनरसाठी ‘इंडियाचे राष्ट्रपती’ ऐवजी ‘भारताच्या राष्ट्रपती’च्या नावाने आमंत्रणे पाठवले आहे. यानंतर देशात भारत (Bharat) आणि इंडिया (India) नावावरुन चर्चा सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. अशातच भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) याने ट्वीट करत या वादात उडी घेतली आणि त्यांच्या ट्विटरची जोरदार चर्चा सुरू झाली. अशातच एका युजर्सने गौतम गंभीरच्या आधी तू खासदार झाला असतास, असे मला नेहमी वाटते, असा प्रश्न विचारला. सेहवागनेही त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना अनेकांची मने जिंकली आहेत. (Virender Sehwag You would have become an MP before Gambhir Veeru won hearts while commenting on politics)

हेही वाचा – ICC Cricket World Cup 2023 : भारतीय संघाची घोषणा; चार खेळाडू खेळणार पहिला विश्वचषक, वाचा कोण?

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नेहमीच देशवासियांना गुलामगिरीची मानसिकेतून आणि त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी बदलण्यासाठी सतत काम करताना दिसत आहेत. राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 डिनरसाठी ‘इंडियाचे राष्ट्रपती’ ऐवजी ‘भारताच्या राष्ट्रपती’च्या नावाने आमंत्रणे पाठवले आहे. त्यामुळे आगामी संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकार राज्यघटनेतून ‘इंडिया’ (Inddia) शब्द हटवण्यासाठी विधेयक आणू शकते आणि ‘भारत’ (Bharat) असे नाव करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आज दिवसभर इंडिया आणि भारत यावरून वाद रंगला होता. अशातच वीरेंद्र सेहवागने या वादात उडी घेतली.

- Advertisement -

आज विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यानंतर वीरेंद्र सेहवागने बीसीसीआयच्या ट्वीटला रिट्विट करत भारतीय संघाच्या जर्सीवर टीम इंडिया ऐवजी भारत लिहायला हवे, असे म्हटले. सेहवागचे ट्वीट थोड्याच वेळात व्हायरल झाले. यानंतर सिद्धार्थ पाय या युजर्सने सेहवागला म्हटले की, तू गौतम गंभीरच्या आधी खासदार झाला असतास, असे मला नेहमी वाटते. सेहवाहने सिद्धार्थ पायच्या प्रश्नाला उत्तर देताना अनेकांची मने जिंकली आहेत.

हेही वाचा – World Cup 2023 : जय शाहा यांनी विश्वचषकासाठी महानायकाला दिले गोल्डन तिकीट; काय आहे खास?

अहंकार आणि सत्तेची भूकेसाठी राजकारणात जाते

वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, माझे मत आहे की बहुतेक बॉलीवूड किंवा खेळाडूंनी राजकारणात येऊ नये. कारण बहुतेक लोक त्यांच्या अहंकार आणि सत्तेच्या भूकेसाठी राजकारणात जातात. त्यांना लोकांसाठी वेळ मिळत नाही. काही अपवाद आहेत, पण सामान्यतः बहुतेक फक्त पीआर करतात. पण खरं तर मला क्रिकेटशी जोडून समालोचन करायला आवडते आणि सोयीनुसार काही काळ राजकारणात येण्याचा किंवा खासदार होण्याची माझी इच्छा नाही.

- Advertisment -