१२ वर्षांपूर्वी याच दिवशी विरेंद्र सेहवागने केली होती कमाल, २९३ धावा करत श्रीलंकेला दिला शॉक

१२ वर्षांपूर्वी ४ डिसेंबर २००९ रोजी भारतीय क्रिकेट प्रशंसकांच्या नजरा या ब्रेबोर्न स्टेडियमवर लागल्या होत्या. जगभरातील स्टार क्रिकेटर सुद्धा हा सामना उत्सुकतेने पाहत होते. भारताचे विस्फोटक फलंदाज, नजफगढचा नवाब आणि मुल्तानचा सुल्तान विरेंद्र सेहवागने ऐतिहासिक कामगिरी केली. परंतु तिसरं शतक झळकावण्यासाठी फक्त ७ धावांनी तो मागे राहीला. महान क्रिकेटर ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या खेळाडूंना टक्कर देण्यासाठी सेहवागला फक्त ७ धावांची आवश्यकता होती. १२ वर्षांपूर्वी विरेंद्र सेहवागने याच दिवशी २९३ इतके स्कोर करत टेस्ट क्रिकेटमध्ये तीसरं शतक झळकावण्यापासून थोडंसं लांब राहीला. नाहीतर त्याने द ग्रेट ब्रायन लाराला सुद्धा मागे टाकलं असतं. टेस्ट क्रिकेटमध्ये ३ वेळा २९० चा आकडा पार केला होता.

मुल्तानचा सुल्तानच्या धमाकेदार खेळीमुळे टेस्ट क्रिकेटमध्ये ९० ओव्हरमध्ये २९३ धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण टीमसह चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण परसलं होतं. या टेस्टमध्ये सेहवागने फलंदाजीला एवढं सोपं केलं होतं की, त्याच्यावर संपूर्ण भारताच्या लोकांचं लक्ष होतं. सेहवागने १०० धावांचा आकडा पार केला होता. मुरलीधरनने सेहवागला चकमा देण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग शोधले. परंतु त्याला यश मिळाले नाही. कारण सेहवागची पक्कड त्यावेळी जबरदस्त होती. श्रीलंकेने सेहवागला रोखण्यासाठी आणि त्याला आऊट करण्यासाठी अनेक मार्ग भेदक मारा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश मिळालं नाही. सेहवागने दुसऱ्या दिवशी स्टंप्सच्या वेळेपर्यंत २८४ धावा बनवल्या होत्या.

क्रिकेटमध्ये सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होतात असे नाही. काही गोष्टी त्याच्या विरूद्ध दिशेने घडतात. सेहवागने तिसऱ्या दिवशीच्या सुरूवातीला अनेक रेकॉर्ड तोडले होते. सेहवागच्या निशाण्यावर ब्रायन लारा होता. त्याला ब्रायन लाराचा रेकॉर्ड तोडायचा होता. ब्रायन लाराने ४०० धावांचा रेकॉर्ड बनवला होता. त्यामुळे तो मोडीत काढण्यासाठी सेहवागने अनेक प्रयत्न केले होते. दोन्ही रेकॉर्ड सेहवागच्या हातात होते. परंतु तिसऱ्या दिवशी मुरलीधरनच्या गोलंदाजीमुळे सेहवाग झेलबाद झाला आणि त्याचं स्वप्न अपूर्ण राहील. परंतु त्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे संपूर्ण खेळाडू आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं.


हेही वाचा: IND vs NZ 2nd Test : १० विकेट्स घेणारा एजाझ पटेल ठरला तिसरा खेळाडू, वानखेडेवर नव्या इतिहासाची नोंद