घरक्रीडा'पुलं'च्या घरी जाऊन गहिवरला सचिन तेंडुलकर!

‘पुलं’च्या घरी जाऊन गहिवरला सचिन तेंडुलकर!

Subscribe

पु.ल.देशपांडेच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त सचिनच्या हस्ते 'आय लव्ह पुलं' (मी पुलं प्रेमी) या कार्यक्रमाच्या लोगोचं आणि पुलोत्सव पुणे या कार्यक्रमाच्या लोगोचं अनावरणही करण्यात आलं. 

पु.ल. या दोन अक्षरांतच सगळं साहित्य विश्व सामावलेलं आहे. पु.ल. देशपांडे हे एक अफाट व्यक्तिमत्व होतं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नुकतीच पुलंच्या पुण्यातील घराला भेट दिली.  सामान्य माणसाशी सहज सोडून घेता येईल असं पुलंचं व्यक्तिमत्व होतं, अशी भावना यावेळी सचिनने व्यक्त केली. पुलंच्या घरी जाऊन मी गहिवरलो आणि भावूक झालो असंही सचिनने सांगतिलं. सर डॉन ब्रॅडमन यांच्या वाढदिवसासाठी त्यांच्या घरी गेल्यावर मला जेवढा आनंद झला होता, तेवढाच आनंद मला पुलंच्या घरी जाऊन झाल्याच्या भावना सचिनने व्यक्त केल्या. पु.लंच्या पुण्यातील भांडारकर रोडवर असलेल्या घराला त्यांनी भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सचिनने पुलंच्या कुटुंबातील काही व्यक्तींचीही भेट घेतली, त्याच्याशी गप्पा मारल्या. तसंच पु.ल.देशपांडेच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त सचिनच्या हस्ते ‘आय लव्ह पुलं’ (मी पुलं प्रेमी) या कार्यक्रमाच्या लोगोचं आणि पुलोत्सव पुणे या कार्यक्रमाच्या लोगोचं अनावरणही करण्यात आलं.

जुन्या आठवणींनी उजाळा

अनावरणाच्या कार्यक्रमादरम्यान सचिन तेंडुलकरने काही जुन्या आठवणींना उजळा दिला. सचिन म्हणाला, की ‘पु ल देशपांडे आणि माझे बाबा चांगले मित्र होते. बाबांनी मला त्यांची अनेक पत्र दाखवली आहेत. माझ्या कुटुंबीयही नेहमीच घरामध्ये पुलंविषयी बोलत असत. १९९६ मध्ये मी सर्वप्रथम त्यांना भेटलो होतो. त्यावेळी आम्ही एकत्र फिश फ्राय खाल्ल्याचंही मला आठवतंय. त्यानंतर त्यांनी मला ही फ्रेम भेट म्हणून दिली होती. आज पुन्हा ही फ्रेम पाहून माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्याचं, सचिन यावेळी म्हणाला.

- Advertisement -
सौजन्य- फेसबुक

पु.ल. येणार तुम्हाला भेटायला…

पु.लंच्या जीवनावर आधारीत ‘भाई…व्यक्ती की वल्ली’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘फाळकेज फॅक्टरी’ या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘भाई…व्यक्ती की वल्ली’ चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटातून भाई आणि सुनीताबाई यांच नातं, पु.लंची मित्रमंडळी अशी अनेक पात्र आपल्यासमोर येणार आहेत. या चित्रपटातून जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तीरेखाही प्रेक्षकांना दिसणार आहेत. अभिनेता सागर देशमुख पु.ल. देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. तर ‘अभिनेत्री इरावती हर्षे सुनीताबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.


वाचा: कायद्याने राममंदिर बांधा नाहीतर, परिस्थीती चिघळेल- रामदेव बाबा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -