घरक्रीडाटीम इंडियाच्या यशात 'या' खेळाडूची प्रमुख भूमिका; लक्ष्मणने केले कौतुक 

टीम इंडियाच्या यशात ‘या’ खेळाडूची प्रमुख भूमिका; लक्ष्मणने केले कौतुक 

Subscribe

भारतीय संघाने इंग्लंडला कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय या तिन्ही मालिकांमध्ये पराभूत केले.

भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोसमात अप्रतिम कामगिरी केली. मागील वर्षी युएईमध्ये आयपीएल स्पर्धा पार पडली. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. या दौऱ्यात भारताच्या बऱ्याच प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या. तसेच कर्णधार विराट कोहली केवळ एक कसोटी सामना खेळला. मात्र, असे असतानाही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने ही कसोटी मालिका २-१ अशी जिंकत ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर इंग्लंडला कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय या तिन्ही मालिकांमध्ये पराभूत केले. भारतीय संघाचे हे यश कौतुकास्पद असून भारताच्या या यशात रिषभ पंतची प्रमुख भूमिका होती, अशा शब्दांत व्ही. व्ही. एस लक्ष्मणने भारताच्या युवा यष्टीरक्षक-फलंदाजाचे कौतुक केले.

यष्टिरक्षणातही खूप सुधारणा 

भारतीय संघाच्या यशात पंतची प्रमुख भूमिका होती. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत दमदार कामगिरी केली. त्याने प्रत्येक वेळी फलंदाजी केली, तेव्हा आता तो अधिक परिपक्व झाल्याचे दिसून आले. त्याने परिस्थितीनुसार खेळ केला. तसेच त्याच्या यष्टिरक्षणातही खूप सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या होत्या. चेंडू खूप वळत होता. मात्र, असे असतानाही त्याने फार चुका केल्या नाहीत, असे लक्ष्मण म्हणाला.

- Advertisement -

पंतची दमदार कामगिरी 

भारतीय संघाने यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळल्या. पंतने या दोन मालिकांमध्ये मिळून ७ कसोटी सामने खेळले आणि या सामन्यांत त्याने ६०.४४ च्या सरासरीने ५४४ धावा केल्या. यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच त्याने ५ एकदिवसीय सामन्यांत १०२ धावा, २ एकदिवसीय सामन्यांत १५५ धावा फटकावल्या.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -