असं काय घडलं की, वकार युनूसने मागितली माफी

waqar-younis-wasim-akram-ramzan-birthday
वसिम अक्रमचा वाढदिवस साजरा करताना वकार युनूस आणि रमीज राजा (सौजन्य - ट्विटर)

पाकिस्तान क्रिकेट संघाचा एकेकाळचा बॉलर वकार युनूसला वसीम अक्रमच्या जन्मदिनानिमित्त केक कापल्यामुळे सोशल मीडियावर माफी मागावी लागली आहे. पाकिस्तानचा पूर्व कप्तान वसिम अक्रमचा ३ जून रोजी वाढदिवस होता. या दिवशी पाकिस्तान आणि इंग्लंडची दुसरी टेस्ट मॅच चालू असताना अक्रमचा वाढदिवस साजरा केला गेला. रमजानच्या महिन्यात केक कापल्यामुळे वकारला सोशल मीडियावर माफी मा गावी लागली आहे.

यासाठी वकारला मागावी लागली माफी…

हेडिंग्लेमध्ये ३ जून रोजी इंग्लंड आणि पाकिस्तान दरम्यान दुसरी टेस्ट मॅच चालू होती. यावेळी वकार युनूस, रमीज राजा आणि वसिम अक्रम हे कॉमेंट्री करत होते. त्यावेळी वकारने अक्रमचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि रमीज राजाबरोबर वसिम अक्रमच्या वाढदिवसाचा केक कापून त्यांनी वाढदिवस साजरा केला. त्यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सने त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. रमजान महिना असूनही असा केक कसा काय कापला? इतके बेजबाबदर कसे असू शकता? अशा तऱ्हेने या पाकिस्तानी क्रिकेटर्सना ट्रोल करण्यात आले.

वकारने मागितली माफी

सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरु झाल्यानंतर वकार युनूसने माफी मागितली. ‘रमजान आणि रोजा ठेवणाऱ्या लोकांची आम्हाला इज्जत केली पाहिजे. यासाठी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो.’ अशा तऱ्हेचं ट्विट त्याने केलं. दरम्यान, दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडनं पाकिस्तानला एक डाव आणि ५५ रन्सनं हरवलं आहे. सध्या दोन्ही संघ १-१ अशी बरोबरीत आहेत.