घरक्रीडाIND vs ENG : टीम इंडियाला धक्का; गिलनंतर आणखी दोन खेळाडू इंग्लंड...

IND vs ENG : टीम इंडियाला धक्का; गिलनंतर आणखी दोन खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून आऊट

Subscribe

कसोटी मालिकेच्या तयारीसाठी भारताने सराव सामना खेळला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पुढील महिन्यापासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टला नॉटिंगहॅम येथे खेळला जाईल. या मालिकेच्या तयारीसाठी म्हणून भारतीय संघाने कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळला. या सामन्यादरम्यान अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज आवेश खान या दोन्ही भारतीय खेळाडूंच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे हे दोघेही इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. याआधी भारताचा सलामीवीर शुभमन गिलला पायाच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घेत मायदेशी परतणे भाग पडले होते.

कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघातून खेळले 

भारत आणि कौंटी सिलेक्ट इलेव्हन हा सामना पार पडला. या सामन्यात सुंदर आणि आवेश खान यांना कौंटी सिलेक्ट  इलेव्हन संघातून भारताविरुद्ध खेळावे लागले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघातून खेळण्यासाठी ११ खेळाडू नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कळवले. त्यानंतर बीसीसीआयने सुंदर आणि आवेश यांना कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघाकडून खेळण्यास सांगितले. आवेश या सामन्याच्या पहिल्या डावात केवळ ९.५ षटके टाकू शकला. तर सुंदरने एका डावात फलंदाजी केली.

- Advertisement -

बदली खेळाडूंची निवड होणार? 

गिलला दुखापत झाल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने दोन बदली सलामीवीर पाठवण्याची बीसीसीआय आणि निवड समितीकडे विनंती केली होती. परंतु, बदली खेळाडू पाठवण्यास नकार देण्यात आला. आता आवेश आणि वॉशिंग्टन यांना दुखापती झाल्यावर बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. इंग्लंड दौऱ्यासाठी भारताने २४ सदस्यीय संघाची (२० मुख्य संघात + चार राखीव खेळाडू) घोषणा केली होती. मात्र, आता त्यापैकी २१ खेळाडूच कसोटी मालिकेसाठी उपलब्ध आहेत. त्यातच आणखी खेळाडूंना दुखापती झाल्यास किंवा कोरोनाची बाधा झाल्यास भारतीय संघ अडचणीत सापडू शकले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -