दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T-20 मालिकेसाठी वसीम जाफरकडून टीम इंडियाची निवड, हार्दिक पांड्याला नेतृत्वाची संधी

Wasim Jaffer selects Team India for T-20 series against South Africa
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T-20 मालिकेसाठी वसीम जाफरकडून टीम इंडियाची निवड, हार्दिक पांड्याला नेतृत्वाची संधी

आयपीएल 2022 चा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे. 9 जूनपासून मालिका सुरु होणार आहे. तसेच लवकरच संघ जाहीर होणार आहे. दक्षिण आफ्रिका मालिका आणि इंग्लंड दौऱ्यासाठी निवड समिती दोन वेगवेगळे संघ निवडू शकतात, असे मानले जात आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिल्यास कनिष्ठ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T-20 मालिकेसाठी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरकडून टीम इंडियाची निवड केली आहे.

आयपीएल 2022 मध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. हे लक्षात घेऊन माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्या संघाची निवड केली आहे. एका मुलाखतीमध्ये जाफरने सांगितले की, वेगवान गोलंदाज उमरान मलिकला त्याच्या खेळात अधिक विविधता आणण्याची आणि अधिकाधिक प्रथम श्रेणी सामने खेळण्याची गरज आहे. दक्षिण आफ्रिका मालिका आणि इंग्लंड दौऱ्यासाठी निवड समिती दोन वेगवेगळे संघ निवडू शकतात, असे मानले जात आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिल्यास कनिष्ठ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. सूर्यकुमार यादव आणि दीपक चहर सारखे खेळाडू अजूनही दुखापतीतून सावरत असल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी संघात नवीन चेहऱ्यांची अपेक्षा आहे.

वसीम जाफरने आपल्या संघात सलामीवीर म्हणून शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ यांची निवड केली आहे. याशिवाय त्याने हार्दिक पांड्याला आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे. राहुल त्रिपाठी आणि हर्षल पटेलसारख्या तरुणांनाही संधी मिळायला हवी, असेही या माजी फलंदाजाने म्हटले आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 जून रोजी दिल्लीत पहिला टी-20 सामना, दुसरा 12 जून रोजी कटकमध्ये, तिसरा सामना 14 जून रोजी विशाखापट्टणममध्ये, चौथा 17 जून रोजी राजकोटमध्ये आणि पाचवा आणि अंतिम टी-20 सामना 19 जून रोजी बंगळुरू येथे खेळायचा आहे.

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी वसीम जाफरचा भारतीय टी-२० संघ : शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, कुलदीप यादव, मोहसीन खान/टी नटराजन.


हेही वाचा : IPL 2022 : मुंबईच्या विजयानंतर RCBचं जंगी सेलिब्रेशन, विराट कोहलीचं ट्विट व्हायरल