लॉर्ड्स मैदावरवर १७ विकेट्स; भारताच्या ‘या’ माजी खेळाडूचा इंग्लंडच्या संघावर निशाणा

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना लंडनच्या (London) लॉर्ड्स (Lords) मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने न्यूझीलंडला ऑल आऊट केले.

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना लंडनच्या (London) लॉर्ड्स (Lords) मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने न्यूझीलंडला ऑल आऊट केले. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांची चर्चा केली जात होती. परंतु, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनीही इंग्लंडच्या फलंदाजांसमोर चेंडूंचा मारा करत ७ विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताचा माजी खेळाडू वसीम जाफर याने इंग्लंडच्या संघाला ट्रोल केले आहे.

वसीम जाफर (Wasim Jaffer) याने ट्विटरवरच्या माध्यमातून इंग्लंडच्या संघाला ट्रोल केले आहे. वसीमने बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) एका गाण्यातील शिर्षकाचा फोटो शेअर केला आहे. या फोटेमध्ये ‘हम करे तो साला कैरेक्टर ढीला है’, असे लिहिण्यात आले आहे. हा फोटो शेअर करताना त्याने, “भारतीय खेळपट्टीवर असे काही घडले असते तर, टीका झाली असती. लॉर्ड्सवर एका दिवसात १७ विकेट पडतात, तेव्हा हे सर्व गोलंदाजांच्या कौशल्यावर अवलंबून असते. जेव्हा अहमदाबादमध्ये (Ahmedabad) एका दिवसात १७ विकेट पडतात, तेव्हा परिस्थितीबद्दल चर्चा होते”, असे लिहत इग्लंडला टोला लगावला आहे.

हेही वाचा – इंग्लंडच्या या खेळाडूचं सीमारेषेवर फलंदाजी करताना आपटलं डोकं; गंभीर दुखापतीमुळे कसोटीतून बाहेर

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ १३२ धावांवर आटोपला. कॉलिन डी ग्रँडहोमनं नाबाद ४२ आणि टीम साऊदीने २६ धावा केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि पदार्पण करणाऱ्या मॅटी पॉट्सने प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. इंग्लंडचा संघ त्यांच्या पहिल्या डावात १४१ धावांवर ऑलआऊट झाला. सलामीवीर जॅक क्रॉलीने ४३ आणि अॅलेक्स लीसने २५ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून टीम साऊथीनं चार आणि ट्रेन्ट बोल्टनं तीन विकेट्स घेतल्या. तर, काईल जेमसनला दोन विकेट्स मिळाल्या.


हेही वाचा – हार्दिक पांड्या, ऋषभ पंत अखेरच्या षटकांमध्ये ‘किलर’ ठरतील; सुनिल गावसकरांचे मत