WBBL 2021 : स्मृती मंधानाने रचला नवा इतिहास; BBL मध्ये शतक करणारी ठरली पहिली भारतीय महिला

WBBL 2021 Smriti Mandhana Becomes First Indian the first ever indian to score century in women s big bash league record equalling 114 not out
WBBL 2021: स्मृती मंधानाने रचला नवा इतिहास, BBL मध्ये शतक करणारी ठरली पहिली भारतीय महिला

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधना हिने महिला बिग बॅश लीग (WBBL) मध्ये नवा इतिहास रचला आहे. या स्पर्धेत शतक ठोकणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. सिडनी थंडरकडून खेळणाऱ्या स्मृती मंधानाने १७ नोव्हेंबर रोजी मेलबर्न रेनेगेड्स  टीमविरुद्ध झालेल्या सामन्यात ६४ बॉल्समध्ये ३ सिक्स आणि १४ फोर करत ११४ रन्सची नाबाद खेळी खेळली. म्हणजे तिने अवघ्या १७ बॉलमध्ये ७४ रन्स केले आहेत.

स्मृतीच्या या खेळीनंतरही सिडनी टीमला हा सामना ४ रन्समुळे गमावावा लागला. प्रथम मेलबर्नने बॅटिंग करत ४ विकेट गमावून १७५ रन केले. या आव्हानाला तोंड देताना सिडनीने २ विकेट गमावून १७१ रन केले.

सिडनीच्या टीमला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी १३ रन्सची गरज होती, पण भारतीय टी-२० टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरने ८ रन्स काढून टीमला विजय मिळवून दिला. मंधाना शेवटच्या ओव्हरमध्ये ४ बॉल खेळली. पण तिला फक्त ६ रन्स काढता आले. यात हरमनप्रीतने ४ ओव्हरमध्ये २७ रन्स घेत एक विकेट मिळवली. त्यामुळे टीमला शेवटच्या बॉल्सवर सिक्सची गरज होती, मात्र स्मृती मंधाना टीमला विजय मिळवून देऊ शकली नाही. परंतु स्मृती मंधानाने फक्त ५७ बॉल्समध्ये शतक पूर्ण केलं आहे. त्यामुळे खेळाच्या १८ व्या सिक्समध्ये मंधानाचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला.

स्मृती मंधाना बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक स्कोअर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. स्मृतीच्या या इनिंगने ऑस्ट्रेलियन फलंदाज एश्ले गार्डनरच्या WBBL इतिहासातील विक्रमी स्कोअरची बरोबरी केली आहे. मंधानाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे तिने सांगलीसह महाराष्ट्राचे नाव देशभर उंचावले आहे.