घरICC WC 2023WC 2023 Final : संजय मांजरेकरांमुळे भारत हरला? युझर्सची टीका, अहमदाबादच्या प्रेक्षकांवरही...

WC 2023 Final : संजय मांजरेकरांमुळे भारत हरला? युझर्सची टीका, अहमदाबादच्या प्रेक्षकांवरही राग अनावर

Subscribe

अहमदाबाद : रविवारी (19 नोव्हेंबर) आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवामागे अनेक तांत्रिक कारणे क्रिकेट तज्ज्ञ सांगत असले तरी सामाजिक युझर्सने आपला राग समालोचक संजय मांजरेकर आणि अहमदाबादच्या प्रेक्षकांवर काढला आहे. (WC 2023 Final India lost because of Sanjay Manjrekar The criticism of the users angered the Ahmedabad audience as well ind vs aus)

सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत की, संजय मांजरेकर यांना कॉमेंट्री करण्यापासून रोखले पाहिजे. त्याचवेळी युझर्सनी असेही म्हटले की, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमऐवजी मुंबईतील वानखेडे मैदान झाला असता तर प्रेक्षकांनी खेळाडूंना निराश केले नसते. सोशल मीडिया युझर्संनी भारताच्या कमकुवत फलंदाजीसाठी समालोचक संजय मांजरेकर आणि त्यांच्या कॉमेंट्रीला एकप्रकारे जबाबदार धरले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तुमचे काही मुद्दा पटले आणि खटकले सुद्धा…, सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर छगन भुजबळ

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीला वर्चस्व राखण्यात यश आले, मात्र त्यानंतर भारताचे तीन फलंदाज बाद झाले आणि इतर फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर झगडत असताना दिसले. अशावेळी अहमदाबादचे प्रेक्षक मात्र नि:शब्द झाले होते. यामागे संजय मांजरेकर कारणीभूत होते का? असा प्रश्न सोशल मीडियावर लोकांना पडला आहे.

- Advertisement -

संजय मांजेकरांबद्दल युझर्स काय म्हणाले?

प्रतिमा दासगुप्ता नावाच्या युजरने लिहिले की, ‘…मांजरेकरांचे ऐकायचे नाही.’ रोशल अलीने लिहिले की, ‘हॉटस्टारने म्यूट कॉमेंटेटरचा पर्याय द्यावा. ते एक सशुल्क वैशिष्ट्य देखील बनवू शकतात. मांजरेकरांचा आवाज न ऐकल्याबद्दल मी दरमहा 100 रुपये देऊ शकतो. सुदिप्तो नावाच्या युझर्सने आरोप केला की, ‘सर्व भारतातील सामन्यांमध्ये संजय मांजरेकर ही अशी व्यक्ती होती की ज्यांना समालोचन बॉक्समध्ये विरोधी संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अधिकृतपणे नियुक्त करण्यात आले होते.’

हेही वाचा – WC 2023 Final: भारताच्या पराभवावर बाबर आझमचं वक्तव्य चर्चेत; भारतीय चाहत्यांचा संताप

प्रेक्षकांच्या शांततेवर युझर्स काय म्हणाले?

अहमदाबादमधील प्रेक्षकांच्या शांततेवर सोशल मीडियावर अनेक युझर्संनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एका युझर्सने लिहिले की, ‘यामुळे तुम्ही वानखेडेसारख्या स्टेडियममध्ये अंतिम सामना आयोजित केला पाहिजे होता. भारतीय संघ संकटात असताना प्रक्षेक शांत झाले. जर वानखेडे असते तर स्टेडियममध्ये जल्लोष असता, गोंगाट असता, यामुळे विरोधकांना भिती वाटली असती आणि ऑस्ट्रेलिया कोणताही फायदा झाला नसता. एका युझर्सने लिहिले की, ‘ही गर्दी खरोखरच लाजिरवाणी होती. कोहलीला चिअर करण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. एका युझर्सने लिहिले की, ‘पॅट कमिन्स म्हणाला होता की, उद्या आमचा उद्देश मोठ्या गर्दीला शांत करणे असेल. त्यानुसार अहमदाबादचे लोक म्हणाले की, आम्ही स्वतः बोलणार नाही, काळजी करू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -