घरICC WC 2023WC 2023 : ICC ची 'Team of The Tournament' जाहीर, भारताच्या 'या'...

WC 2023 : ICC ची ‘Team of The Tournament’ जाहीर, भारताच्या ‘या’ 6 खेळाडूंचा समावेश

Subscribe

ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विश्वचषक स्पर्धेसाठी आपली प्लेइंग इलेव्हन म्हणजेच 'Team Of The Tournament' जाहीर केली आहे. यामध्ये विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : ICC Cricket World Cup 2023 च्या अंतिम सामन्यात भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकात सलग 10 सामने जिंकून सुद्धा भारताला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत करत विश्वचषक 2023 स्वतःच्या नावे केला. परंतु ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विश्वचषक स्पर्धेसाठी आपली प्लेइंग इलेव्हन म्हणजेच ‘Team Of The Tournament’ जाहीर केली आहे. यामध्ये विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अंतिम सामन्यात पराभूत होऊन देखील भारताच्या एकूण 6 खेळाडूंचा या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. परंतु, विजयी संघ राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार असलेल्या पॅट कमिन्स याला यामध्ये स्थान मिळालेलेन नाही. तर रोहित शर्मा आयसीसीच्या या प्लेइंग इलेव्हनमध्येही कर्णधार राहिला आहे. (WC 2023: ICC’s ‘Team of The Tournament’ Announced, Includes ‘These’ 6 Players from India)

हेही वाचा – अंतिम सामन्यांत नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे ठरले; अक्रमने सांगितले टीम इंडियाच्या पराभवाचे कारण

- Advertisement -

ICC कडून जाहीर करण्यात आलेल्या Team Of The Tournament मध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी यांचा समावेश करण्यात आला आहे. तर याशिवाय, दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-ओपनर क्विंटन डी कॉक, विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलियातील फिरकीपटू अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू अॅडम झाम्पा, न्यूझीलंड संघातील डॅरेल मिशेल, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका यांना स्थान मिळाले आहे. तर 12 वा खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेलॉर्ड कोएत्झी याचा समावेश करण्यात आला आहे.

साधारणतः दीड महिना चाललेल्या या विश्वचषकातील खेळात ज्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे, त्यांना आयसीसीकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाते. त्यानुसार, पाच उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत आणि पाच उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत, अशा खेळाडूंची निवड करण्यात येते. परंतु, या प्लेइंग इलेव्हनमध्ये अष्टपैलू कामगिरीच्या आधारे जडेजाची निवड करण्यात आली आहे. तर आयसीसीकडून प्रत्येकी पाच गोलंदाज आणि फलंदाजांची नावे देखील त्यांनी केलेल्या कामगिरीसह जाहीर करण्यात आलेली आहेत.

- Advertisement -

विश्वचषक 2023 चे टॉप-5 फलंदाज

विराट कोहली – 765 धावा
रोहित शर्मा – 597 धावा
क्विंटन डी कॉक – 594 धावा
रचिन रवींद्र – 578 धावा
डॅरेल मिशेल – 552 धावा

वर्ल्ड कप 2023 चे टॉप-5 विकेट घेणारे खेळाडू

मोहम्मद शमी – 24 विकेट
अॅडम झाम्पा – 23 विकेट्स
दिलशान मदुशंका – 21 विकेट्स
जसप्रीत बुमराह – 20 विकेट्स
जेराल्ड कोएत्झी – 20 विकेट्

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -