घरICC WC 2023WC 2023 : पराभवानंतर भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी ड्रेसिंग रुममध्ये

WC 2023 : पराभवानंतर भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी ड्रेसिंग रुममध्ये

Subscribe

अहमदाबाद : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला मोठ्या पराभवाचा करावा लागला. यानंतर देशातील क्रिकेट चाहत्यांच्या हाती निराशा आली. विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पाहाण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्टेडियमवर उपस्थित होते. पराभवानंतर पंतप्रधान मोदी हे स्वत:

ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखत पराभव केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी स्वत: ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले. पंतप्रधान मोदींचा फोटो अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. रवींद्र जडेजा ट्वीट करत म्हणाला, विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामन्या चांगला खेळलो. पण आम्ही कालच्या सामन्यात कुठे तरी कमी पडलो. पराभव झाल्यामुळे आमच्या सर्वांचे मन दु:खी झाले आहे. पण आमचे मनोबल वाढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल ड्रेसिंग रुममध्ये येऊन सर्व खेळाडूंची भेट घेतली आणि आमचे मनोबल मजबूत केले.”

- Advertisement -

हेही वाचा – IND vs AUS Final : पराभवानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ BCCI कडून ट्वीट

- Advertisement -

असा झाला सामना

विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना हा गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ 240 धावा करू शकला. दरम्यान, केएल राहुलने 107 चेंडूत सर्वाधिक 66 धावांची संथ खेळी तर विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा आणि सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत केवळ 18 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

हेही वाचा – WC 2023 : ICC ची ‘Team of The Tournament’ जाहीर, भारताच्या ‘या’ 6 खेळाडूंचा समावेश

भारताकडून मिळालेल्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने 4 विकेट गमावून सामना जिंकत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने 120 चेंडूंत 137 धावांची सर्वाधिक खेळी केली. याशिवाय मार्नस लॅबुशेनने नाबाद 58 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 2 तर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. या पराभवामुळे रोहित शर्मा कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकला नाही. कपिल देव यांनी 1983 मध्ये आणि धोनीने 2011 मध्ये भारताला विश्वचषक जिंकवून दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -