घरICC WC 2023WC Final 2023 : कपिल देव यांना निमंत्रित न केल्याबद्दल काँग्रेसची तीव्र...

WC Final 2023 : कपिल देव यांना निमंत्रित न केल्याबद्दल काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया

Subscribe

नवी दिल्ली : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या सामन्यासाठी 1983मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव यांना आमंत्रण दिले नसल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून आता राजकारण रंगले आहे. कपिल देव यांना अंतिम सामन्यासाठी निमंत्रित न केल्याबद्दल काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णयाचे अत्यंत वाईट असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – WC 2023 Final: भारताच्या पराभवावर बाबर आझमचं वक्तव्य चर्चेत; भारतीय चाहत्यांचा संताप

- Advertisement -

महिला कुस्तीपटूंनी अलीकडेच केलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी टिप्पणी केली आहे. अहमदाबादमध्ये आयोजित केलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी क्रिकेट बोर्डाने कपिल देव यांना निमंत्रित केले नाही, हे पूर्णपणे अस्वीकार्य आणि अतिशय हीन कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

बेदींप्रमाणेच कपिल देवही स्पष्टपणे आपली भूमिका मांडणारे म्हणून ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ते उघडपणे मैदानात उतरले होते, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला लक्ष्य केले. राजधानी दिल्लीत विनेश फोगट, साक्षी मलिक यांच्यासह अनेक कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निदर्शने करत होते.

हेही वाचा – या अश्रूंची कधीतरी फुले होतील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून रोहित शर्माला प्रोत्साहन

अंतिम सामन्याला का गेले नाहीत, असे एका वाहिनीने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, मला निमंत्रण नव्हते. मला बोलावले म्हणून, मी येथे आलो, तिकडे बोलावले नाही, मी गेलो नाही. एवढीच गोष्ट आहे. माझ्या 1983मधील सर्व संघाला बोलावायला पाहिजे होते, अशी माझी इच्छा होती. पण एवढे काम चालू आहे, खूप लोक, खूप जबाबदाऱ्या आहेत. कधीकधी लोक विसरतात, असे कपिल देव म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -