घरक्रीडाबरं झालं जडेजा एकच मॅच खेळला - फारब्रेस

बरं झालं जडेजा एकच मॅच खेळला – फारब्रेस

Subscribe

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संघात स्थान दिले गेले. त्याने या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला भारताने एकाच सामन्यात खेळवल्याने इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक खुश झाले आहेत.

रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात ४ विकेट घेतल्या. तर भारताच्या पहिल्या डावात अवघड परिस्थिती त्याने ८६ धावांची खेळी केली. भारताची अवस्था ६ बाद १६० अशी होती. त्यानंतर फलंदाजीला येत त्याने हनुमा विहारीसोबत भारताचा डाव सावरला. त्यामुळे भारताने पहिल्या डावात २९२ इतकी मजल मारली. मात्र, जडेजाला या मालिकेतील पहिल्या चार सामन्यांत भारताने संघात स्थान दिले नव्हते. त्याला अवघा एकच सामना खेळायला मिळाला. यामुळे जडेजा कदाचित खुश नसेल पण इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक बरेच खुश आहेत.

जडेजा एक अप्रतिम खेळाडू

जडेजाविषयी फारब्रेस म्हणाले, “जडेजा एक अप्रतिम खेळाडू आहे. तो खरा अष्टपैलू खेळाडू आहे. तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हींतही आपले योगदान देतो. त्यामुळे भारताने त्याला एकचं सामना खेळवला याचा मला आनंद आहे. त्याने या सामन्यात खूप चांगली फलंदाजी केली.”

 

इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल फारब्रेस (सौ-Skysports)

कूकची कमी जाणवेल

इंग्लंडचा सलामीवीर आणि विक्रमी फलंदाज अॅलेस्टर कूक भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर निवृत्त होणार आहे. फारब्रेस जेव्हा इंग्लडशी जोडले गेले तेव्हा कूकच इंग्लंडचा कर्णधार होता. तो निवृत्त होणार असल्याने त्याची कमी इंग्लंडला जाणवेल असे फारब्रेस यांचे मत आहे. ते म्हणाले, “त्याची फलंदाजी, त्याच्या धावा यांची कमी आम्हाला जाणवेलचं पण त्याहूनही त्याचा शांतपणे सगळे हाताळण्याची सवय याची कमी आम्हाला जास्त जाणवेल. तो सगळ्यांशी खूप आदराने वागतो. त्यामुळे सगळे त्याचाही खूप आदर करतात. त्याच्याशी तुम्ही कसलीही चर्चा करू शकता.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -