घरक्रीडाT20 World Cup : भारतातील कोरोना वाढत राहिला तर 'प्लॅन बी' वापरावा...

T20 World Cup : भारतातील कोरोना वाढत राहिला तर ‘प्लॅन बी’ वापरावा लागेल!

Subscribe

टी-२० वर्ल्डकप यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे.

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आयोजनात बरेच अडथळे येत आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. कोरोनामुळे ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना घेण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर, आता आयसीसी टी-२० वर्ल्डकपबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. टी-२० वर्ल्डकप यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. भारतात कोरोनाचा धोका असाच वाढत राहिला तर आमच्याकडे पर्यायी योजना तयार असल्याचे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफअ‍ॅलर्डाइस यांच्याकडून सांगण्यात आले.

बीसीसीआयशी सतत संपर्कात

भारतात यावर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप ठरल्याप्रमाणेच आयोजित करण्यासाठी आम्ही काम सुरु केले आहे. आमच्याकडे पर्यायी योजना (प्लॅन बी) तयार आहे, पण सध्या आम्ही त्या योजनांचा फारसा विचार करत नाही. आम्ही बीसीसीआयशी सतत संपर्कात आहोत. आमच्याकडे पर्यायी योजना आहे आणि गरज पडल्यास आम्ही त्या योजनांच्या दिशेने विचार करू. मात्र, सध्या तरी आम्ही टी-२० विश्वचषकाची तयारी सुरु केली आहे, असे अ‍ॅलर्डाइस म्हणाले.

- Advertisement -

युएईमध्ये वर्ल्डकपचे आयोजन?

मागील वर्षी कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा भारतात न होता युएईमध्ये झाली होती. त्यामुळे यंदा भारतात टी-२० वर्ल्डकप न होऊ शकल्यास आयसीसी युएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करू शकेल. तसेच सध्या कोरोनाच्या काळातही विविध देशांमध्ये क्रिकेटचे सामने होत आहेत. त्यामुळे या सर्व देशांकडून काही गोष्टी शिकण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही अ‍ॅलर्डाइस यांनी नमूद केले.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -