घरक्रीडाIND vs ENG : दुसऱ्या कसोटीतील पराभवातूनही शिकायला मिळाले - जो रूट

IND vs ENG : दुसऱ्या कसोटीतील पराभवातूनही शिकायला मिळाले – जो रूट

Subscribe

इंग्लंडला दोन्ही डावांमध्ये २०० धावांचा टप्पा पार करता आला नाही.

इंग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली होती. मात्र, दुसऱ्या कसोटीत फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर इंग्लंडच्या संघाने निराशाजनक खेळ केला. त्यांना दोन्ही डावांमध्ये २०० धावांचा टप्पा पार करता आला नाही. दुसरीकडे भारताने मात्र उत्कृष्ट फलंदाजी करत ३२९ आणि २८६ धावा केल्या. भारताचे फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (८ विकेट) आणि अक्षर पटेल (७ विकेट) या सामन्यात योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यामुळे फिरकीविरुद्ध कसे खेळले पाहिजे आणि प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे, हे या सामन्यात आम्हाला शिकायला मिळाल्याचे विधान इंग्लंडचा कर्णधार जो रूटने केले.

आम्ही पुनरागमन करू

आम्हाला या पराभवातूनही शिकायला मिळाले. काही वेळा खेळपट्टी आणि परिस्थिती तुम्हाला विपरीत असते. मात्र, तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेणे गरजेचे असते. या सामन्यात पराभव झाला असला, तरी पुढील सामन्यात आम्ही पुनरागमन करू याची मला खात्री आहे. आम्ही सामना जिंकल्यावर फार आनंदी होत नाही आणि पराभूत झाल्यावर फार निराश होत नाही, असे रूट म्हणाला.

- Advertisement -

भारताने दर्जेदार खेळ केला

आम्ही मागील काही काळात आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर चांगले क्रिकेट खेळले आहे. मात्र, या सामन्यात भारताने आमच्यापेक्षा दर्जेदार खेळ केला आणि ते सामना जिंकले. खेळपट्टी फिरकीला अनुकूल होती. मात्र, भारताने फारच चांगला खेळ केला, असेही रूटने सांगितले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -