घरक्रीडाIND vs ENG : पहिल्या डावातील निराशाजनक फलंदाजीचा भारताला फटका बसला - कोहली

IND vs ENG : पहिल्या डावातील निराशाजनक फलंदाजीचा भारताला फटका बसला – कोहली

Subscribe

इंग्लंडला पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी मिळाली होती.

पहिल्या डावात आम्ही फलंदाजीत निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे इंग्लंडला मोठी आघाडी मिळाली आणि याचा आम्हाला फटका बसला, असे पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला. जो रूटच्या द्विशतकामुळे इंग्लंडने पहिल्या डावात ५७८ धावांची मजल मारली होती. याचे उत्तर देताना भारताचा डाव ३३७ धावांत आटोपल्याने इंग्लंडला २४१ धावांची आघाडी मिळाली. या डावात रिषभ पंत (९१), वॉशिंग्टन सुंदर (नाबाद ८५) आणि पुजारा (७३) यांनी अर्धशतके केली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतर त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.

इंग्लंडला मोठी आघाडी मिळाली

आमच्या पहिल्या डावातील निराशाजनक फलंदाजीमुळे या सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले. आम्हाला मोठ्या धावा करायच्या होत्या. आमच्या एका फलंदाजाने जरी शतक केले असते, तरी आम्हाला झुंज देण्याची संधी निर्माण झाली असती. मात्र, पहिल्या डावात इंग्लंडला मोठी आघाडी मिळाली आणि याचा आम्हाला फटका बसला. आता पुढील सामन्यांत आमचे मोठ्या भागीदाऱ्या करण्याचा प्रयत्न असेल, असे कोहलीने स्पष्ट केले.

- Advertisement -

…म्हणून नदीमला संधी

तसेच कुलदीप यादवला संधी न देण्याविषयी कोहली म्हणाला, आम्ही दोन ऑफस्पिनर्सना संघात स्थान दिले होते. कुलदीप चायनामन गोलंदाज असल्याने त्याचा चेंडूही उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी आत येतो. गोलंदाजीत विविधता असावी म्हणून आम्ही कुलदीपच्या जागी नदीमला संघात घेतले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ भारतीय फलंदाजाच्या भीतीमुळे दुसरा डाव घोषित केला नाही


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -