घरक्रीडामीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी, कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक

मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी, कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक

Subscribe

भारताची दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानूने कॉमनवेल्थ गेम्स २०२२मध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे. एकूण २०१ किलोग्राम वजन उचलत मीराबाईनं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

- Advertisement -

स्टार वेटलिफ्टर असलेल्या मीराबाईने पहिल्याच प्रयत्नात ८४ किलो वजन उचलले आहे. तर दुसऱ्या प्रयत्नात ८८ किलो वजन उचलून तिने रेकॉर्ड तोडला आहे. तसेच तिसऱ्या प्रयत्नात चानूने ९० किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण त्यात तिला अपयश आलं. मॉरीशसची रनाइवोसोवाने ७६ किलो वजन उचलून दुसरं स्थान गाठलं. तर नायजेरियाची स्टेला किंग्सीने ७५ किलो वजन उचलून तिसरं स्थान पटकावलं.

- Advertisement -

मीराबाईने क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन उचललं. त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये ८८ किलो वजन उचलत मीराबाईने आपली आघाडी कायम ठेवली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या मीराबाईकडून कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा पूर्ण झाली.

दरम्यान, इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने आज दिवसभरात तीन पदकं मिळवली आहेत. संकेत सरगर आणि गुरुराज पुजारी यांनी रौप्य आणि कांस्य पदक मिळवलं आहे.


हेही वाचा : CWC 2022 : सांगलीच्या संकेत सरगरची बर्मिंगहममध्ये कमाल, भारतासाठी पटकावलं सिल्वर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -