घरक्रीडावेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Subscribe

आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पोलार्डने बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची माहिती दिली. पोलार्डने केलेल्या अचानक निवृत्तीच्या घोषणेमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पोलार्डने बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची माहिती दिली. पोलार्डने केलेल्या अचानक निवृत्तीच्या घोषणेमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली असली तरी, तो आयपीएलमध्ये खेळणार आहे.

कायरन पोलार्ड हा वेस्ट इंडिज संघाच्या मर्यादित षटकाचा कर्णधार होता. मागील 15 वर्षांपासून पोलार्ड वेस्ट इंडिज संघाचा सदस्य आहे. सध्या पोलार्ड भारतामध्ये सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत व्यस्त आहे. पोलार्ड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करत आहे. पोलार्डने वेस्ट इंडिजसाठी 123 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 2706 धावा आणि 55 विकेट घेतल्या आहे.

- Advertisement -

कायरन पोलार्डने सर्व फॉर्मेटमध्ये एकूण 224 सामने खेळला आहे. त्याने 4000 पेक्षा जास्त धावा आणि 97 विकेट काढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पोलार्डने 101 सामन्यात 135.14 च्या स्ट्राइक रेटने 1568 धावा केल्या आहेत. पोलार्डने 587 टी 20 सामन्यात 11509 धावा केल्या आहेत. सर्वाधिक टी 20 धावा चोपणाऱ्या खेळाडूंमध्ये पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने जगातील अनेक टी 20 लीगमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.

2007 साली पोलार्डने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. 20 फेब्रुवारीला भारताविरुद्ध कोलकाता येथे तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सामन्यात कायरन पोलार्डने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारले होते. त्यावेळी अशी कामगिरी करणारा तो वेस्ट इंडिजचा तिसरा क्रिकेटपटू आहे.

- Advertisement -

पोलार्ड वेस्ट इंडिजसाठी 123 वनडे आणि 101 टी 20 सामने खेळला. पोलार्ड वेस्ट इंडिजसाठी कधीही कसोटी सामना खेळला नाही. वनडे आणि टी 20 खेळाडू म्हणूनच पोलार्डकडे पाहिलं गेलं.


हेही वाचा – IPL 2022: ‘मुंबई’ला विजयासाठी संघात ‘तेंडुलकर’ नाव जोडण्याची गरज; मोहम्मद अझरुद्दीन यांचा सल्ला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -