NED vs WI : शाय होपची शतकी खेळी, वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून नेदरलँड्सवर विजय

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध नेदरलॅंड (Netherlands) यांच्यात झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने 7 गडी राखून नेदरलँड्सचा पराभव केला. यष्टिरक्षक व सलामीवीर शाय होपच्या (shai hope) यांच्या नाबाद (Not Out) शतकी खेळीच्या जोरावर डकवर्थ-लुईस नियमांतर्गत पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला.

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध नेदरलॅंड (Netherlands) यांच्यात झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने 7 गडी राखून नेदरलँड्सचा पराभव केला. यष्टिरक्षक व सलामीवीर शाय होपच्या (shai hope) यांच्या नाबाद (Not Out) शतकी खेळीच्या जोरावर डकवर्थ-लुईस नियमांतर्गत पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 2 जून रोजी होणार आहे.

या सामन्यात नेदरलँड प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने हा सामना पावसामुळे सामना 45-45 षटकांचा करण्यात आला. त्यानुसार, फलंदाजी करताना नेदरलँडने 45 षटकांत 7 गडी गमावून 240 धावा केल्या. सलामीवीर विक्रमजीत सिंगने 45 चेंडूत 47 तर तेजा निदानमारूने 51 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या. सलामीवीर मॅक्स ओ’डाऊडने 69 चेंडूत 39 धावा केल्या. त्यानंतर पाहुण्या वेस्ट इंडिजला 247 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. वेस्ट इंडिजने 43.1 षटकात 3 गडी गमावून 249 धावा करत सामना जिंकला.

हेही वाचा – वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

120 धावांची भागीदारी

शाय होप आणि शामराह ब्रूक्स यांनी वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. ब्रूक्सने 67 चेंडूत 60 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. लोगान व्हॅन वीक्सने शमराह ब्रूक्सला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. यानंतर वेस्ट इंडिजला झटपट दोन धक्के बसले. क्रुमा बोनर आणि कर्णधार निकोलस पूरन स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. बोनरला खातेही उघडता आले नाही आणि पूरनने 7 धावांचे योगदान दिले.

होपला ब्रेंडन किंगची साथ

कर्णधार पूरन बाद झाल्यानंतर होपला ब्रेंडन किंगची साथ मिळाली. दोन्ही फलंदाजांनी समंजस खेळी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला. होप आणि किंग यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 116 धावांची भागीदारी केली. होपने 130 चेंडूत नाबाद 119 धावा केल्या. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 2 षटकार मारले, तर किंगने 51 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार मारत अर्धशतकी खेळी केली.


हेही वाचा – भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूचे नशीब फळफळले, काहीही न करता बनला आयपीएल चॅम्पियन