घरक्रीडाWI vs SA : केवळ एका प्रथम श्रेणी सामन्यानंतर विंडीजने दिली गोलंदाजाला...

WI vs SA : केवळ एका प्रथम श्रेणी सामन्यानंतर विंडीजने दिली गोलंदाजाला पदार्पणाची संधी

Subscribe

मागील वर्षी झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये सिल्सने सहा सामन्यांत १० विकेट घेतल्या होत्या.

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. सेंट लुसिया येथे होत असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विंडीजने या सामन्यात १९ वर्षीय वेगवान गोलंदाज जेडन सिल्सला पदार्पणाची संधी दिली. विशेष म्हणजे, सिल्सला केवळ एका प्रथम श्रेणी सामन्याचा अनुभव आहे. मात्र, त्याने विंडीजच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला आता कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

१९ वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये १० विकेट 

मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये सिल्सने सहा सामन्यांत १० विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्याला ट्रिंबॅगो नाईट रायडर्सने संधी दिली आणि त्याने सहा सामन्यांत आठ गडी बाद केले. परंतु, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत केवळ एक सामना खेळला आहे. वेस्ट इंडिज ‘अ’ संघाकडून खेळताना न्यूझीलंड ‘अ’विरुद्ध त्याला केवळ एक विकेट घेता आली.

एल्गरचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिला सामना

विंडीजने एका प्रथम श्रेणी सामन्याचा अनुभव असलेल्या सिल्सला संघात स्थान दिले आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने कीगन पीटरसन आणि कायेल वेयायन या फलंदाजांना पदार्पणाची संधी दिली असून हे दोघेही ४० हून अधिक प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. तसेच डीन एल्गरचा दक्षिण आफ्रिकन कसोटी संघांचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -