वेस्ट इंडिजचे खेळाडू मास्क लावून खेळले सामना, प्रेक्षकांमध्ये कोरोनाची चर्चा

पाकिस्तान (Pakistan) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचे खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले. सर्व ११ खेळाडूंना मास्क घालून खेळताना पाहिल्याने सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये चर्चांना उधाण आले.

पाकिस्तान (Pakistan) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचे खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले. सर्व ११ खेळाडूंना मास्क घालून खेळताना पाहिल्याने सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये चर्चांना उधाण आले. या खेळाडूंनी मास्क का घातला आहे? कोरोनाचे कारण असेल का? असे सवाल उपस्थित होत होता. परंतु, मुलतानमध्ये धुळीचं वादळ आल्यामुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी मास्क लावला होता. (west indies player uses mask to save from dust storm in multan)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलतानमध्ये धुळीचे वादळ आल्यामुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी मास्क (Mask) लावला होता. धुळीचं (Dust) हे वादळ इतकं जोरदार होते की मॅचही काही काळ थांबवावी लागली. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला, पण ३३ षटकांनंतर सामना थांबवण्यात आला. तीन वनडे (ODI) सामन्याच्या या मालिकेमध्ये पाकिस्तानने आधीच २-०ने विजयी आघाडी घेतली आहे.

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानने ४८ षटकांमध्ये २६९/९ पर्यंत मजल मारली. वादळामुळे सामना ४८ षटकांचा करण्यात आला.

हेही वाचा – भुवनेश्वरची चमकदार खेळी, गोलंदाजीच्या जोरावर एकाच सामन्यात रचले मोठे विक्रम

पाकिस्तानकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शादाब खान याने ८६ धावाची खेळी केली. तर इमाम उल हक ६२ धावा करून बादा झाला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार निकोलस पूरन याने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. कीमो पॉलला २, जेडन सिल्स, हेडन वॉल्श आणि अकील हुसैन यांना १-१ विकेट घेण्यात यश आलं.


हेही वाचा – सांगलीच्या काजोल सरगरची खेलो इंडिया स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी