घरक्रीडाविंडीज उपांत्य फेरी गाठेलच!

विंडीज उपांत्य फेरी गाठेलच!

Subscribe

केविन पीटरसनचे मत

गुरुवारपासून सुरु झालेला क्रिकेट विश्वचषक जिंकण्यासाठी यजमान इंग्लंड आणि भारत या संघांना प्रमुख दावेदार मानले जात आहे. त्याचसोबत गतविजेता ऑस्ट्रेलिया संघही किमान उपांत्य फेरी गाठले असे बर्‍याच क्रिकेट समीक्षकांना वाटते. मात्र, उपांत्य फेरी गाठणारा चौथा संघ कोण असणार याबाबत सर्वांची विविध मते आहेत. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनच्या मते भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त वेस्ट इंडिज हा संघ उपांत्य फेरी गाठले. वेस्ट इंडिजचा या विश्वचषकातील पहिला सामना शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

वेस्ट इंडिजचा संघ कसा खेळेल याचा अंदाज बांधता येत नाही. मात्र, या संघात खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. सराव सामन्यात त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध अप्रतिम खेळ करत तो सामना जिंकला. त्यांनी या संघात फॉर्मात असलेल्या आंद्रे रसेलची निवड केली आहे. त्याच्याकडे गेलसारखा सलामीवीर आहे. या संघात खूप चांगले युवा खेळाडूही आहेत. वेस्ट इंडिजचा सध्याचा संघ मला आवडतो. ते हा विश्वचषक जिंकू शकतात असे मला वाटते का, तर नाही. मात्र, हा संघ उपांत्य फेरी नक्कीच गाठेल. भारत आणि इंग्लंड हे संघ हा विश्वचषक जिंकण्याचे प्रमुख दावेदार असून ऑस्ट्रेलियाचा संघही हा विश्वचषक जिंकू शकेल, असे पीटरसन म्हणाला.

- Advertisement -

पीटरसनप्रमाणेच द.आफ्रिकेचा महान अष्टपैलू जॅक्स कॅलिसलाही वेस्ट इंडिज संघाकडून खूप अपेक्षा आहेत. तो म्हणाला, वेस्ट इंडिजचा संघ या स्पर्धेत चांगला खेळेल असे मला वाटते. या संघात बरेच चांगले खेळाडू आहेत. खासकरून अष्टपैलू रसेलवर माझे लक्ष असेल. त्याने आपला खेळ वेगळ्याच उंचीवर नेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -